नाशिक : वणी वन विभागाच्या वनास अज्ञाताने लावली आग

वनास आग,www.pudhari.news

वणी (जि. नाशिक)  : पुढारी वृत्तसेवा

वणी वन विभागाच्या फोपशी रस्त्यावरील जवळपास असलेल्या वन विभागाच्या वनास (दि. १९) रात्री ९.३० वाजेच्या दरम्यान कुणी अज्ञाताने आग लावली. या आगीत या भागातील गवत व लहान झाडे जळाली आहे. मोठ्या प्रमाणात वन संपदा जळाल्याने वनाची मोठी हानी झाली आहे.

उन्हाळ्याचे दिवस असून वाळलेले गवत झटकन पेटले गेले. आग लागल्याची माहिती कळताच वन विभागाचे कर्मचारी व आजुबाजूच्या नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. काही तासात आग विझवण्यात यश आले असले तरीही काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात झाडाझुडपात आग आजूनही चालु आहे. या आगीत जवळपास बराच भाग जळाला आहे. या बाबत वन कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता कुणी तरी अज्ञात व्यक्तीने हा वनवा पेटवून दिला असल्याची माहिती आहे.

वनपाल वामन तुंगार, वनरक्षक हेमराज महाले, अन्ना टेकनर, ज्ञानेश्वर वाघ, जे. डी झिरवाळ, वन मजुर भगरे, जाधव यांनी ब्लोअर व झाडांच्या फांद्या व असलेल्या साधनांच्या आधारे आग विझवली. मार्च महिन्यात वणी नाशिक रस्त्यावर कृष्ण गावच्या वन विभागाच्या जागेत अशीच आग लावण्यात आली होती. हे प्रकार होत असल्याने वन विभागाची चिंता वाढली आहे. वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी अधिक तपास करीत आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : वणी वन विभागाच्या वनास अज्ञाताने लावली आग appeared first on पुढारी.