नाशिक : वऱ्हाडाचा टेम्पो उलटल्याने ७ जखमी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवरगाव – वाकी हर्ष रस्त्यावरील पुलावर वऱ्हाडाचा टेम्पो उलटला. यात सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. मात्र जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवरगाव येथून वाकी हर्षच्या दिशेने जाणारा वऱ्हाडाचा टेम्पो लोहिळी पुलावरील वळणावर उलटला. टेम्पो जागेवरच उलटल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात सुभद्रा धर्माजी गायकवाड (५५), मंगल सुखदेव गायकवाड (३८), अनिता सतीश गायकवाड (२८), मंजुळाबाई मधुकर मोंढे (५०), मधुकर विठ्ठल मोंढे (६०), चित्रा नारायण गायकवाड (३८), हौसा कृष्णा गायकवाड (३५), नारायण बबन गायकवाड (४८) या जखमींचा समावेश आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : वऱ्हाडाचा टेम्पो उलटल्याने ७ जखमी appeared first on पुढारी.