नाशिक : वसुलीस गेलेल्या फायनान्स कर्मचाऱ्याला मारहाण, दंगलीचा गुन्हा दाखल

दिंडोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

फायनान्स कंपनीकडून कर्जाऊ घेतलेल्या दुचाकीचा हप्ता जमा करण्यासह व्हेरिफिकेशनासाठी गेलेल्या कर्मचाऱ्याला लाकडी दांडक्याने मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून वणी पोलिसांत दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहित संपत धुळे याने एका फायनान्स कंपनीकडून कर्जाऊ दुचाकी घेतली होती. या दुचाकीचा हप्ता जमा करण्यासह व्हेरिफिकेशनसाठी फायनान्स कंपनीचा कर्मचारी मयूर अशोक ठाकरे (32, रा. कोणार्कनगर, जत्रा हाॅटेलजवळ, नाशिक) गेला असता, रोहितने दुचाकी वैभव मोगल यांना विक्री केल्याची माहिती ठाकरे यांना मिळाली. दुचाकीचा हप्ता जमा केला नाही व व्हेरिफिकेशन करू दिले नाही. तसेच रोहितने वैभवशी संपर्क साधत गैरकायद्याची मंडळी जमवित दांड्याने मारहाण करत पाठीवर व डोक्यात दुखापत केली. तसेच इतरांनी लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत, पुन्हा आला तर जेसीबीने खड्डा खोदुन गाडून टाकू, असा दम दिला. अशी फिर्याद मयूरने दिल्याने रोहित धुळे, वैभव मोगल, उमेश मोगल, वसंतराव मोगल व एक अज्ञात अशा लोकांविरोधात वणी पोलिसांनी दंगलीचा गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : वसुलीस गेलेल्या फायनान्स कर्मचाऱ्याला मारहाण, दंगलीचा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.