नाशिक : शेततळ्यात पडून तरुणीचा मृत्यू, खडकजांब येथील घटना

शेततळ्यात बुडून मृत्यू,www.pudhari.news

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

रात्रीच्या वेळी लाइट आली म्हणून शेततळ्यातील पाणी विहिरीत सोडण्यासाठी डोंगळा सुरू करण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय तरुणी पाय घसरून शेततळ्यात पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना चांदवड तालुक्यात घडली. या प्रकरणी शंकर काशीनाथ भवर (४५) यांनी दिलेल्या माहितीवरून वडनेरभैरव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

खडकजांब येथील रोहिणी साहेबराव भवर (२१) ही तरुणी रविवारी रात्रीच्या सुमारास लाइट आली म्हणून शेततळ्यातील पाणी विहिरीत टाकण्यासाठी डोंगळा चालू करण्यासाठी गेली होती. यावेळी पाऊस सुरू असल्याने रोहिणीचा पाय घसरल्याने ती शेततळ्यात पडली. शेततळ्यात जास्त पाणी असल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वडनेरभैरवचे सहायक पोलिस निरीक्षक मयूर भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रावसाहेब त्रिभुवन व पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे. या घटनेबाबत खडकजांब पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक रावसाहेब त्रिभुवन करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : शेततळ्यात पडून तरुणीचा मृत्यू, खडकजांब येथील घटना appeared first on पुढारी.