नाशिक : सिडकोत खड्ड्यांना हार, फुल वाहून राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

गेल्या आठ ते दहा दिवसांपासून नाशकात पावसाची संततधार सुरु होती. या पावसामुळे नाशिकच्या सिडको परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिडको यांच्या वतीने खड्ड्यांना हार, फुल वाहून निषेध म्हणून आंदोलन करण्यात आले.

पावसामुळे नवीन नाशिक सिडको भागात अनेक ठिकाणी रस्त्याला खड्डे पडले आहेत. नाशिक महानगरपालिकेचे बांधकाम विभाग अकार्यक्षम ठरत  आहे. याबाबत सिंहस्थ नगर येथील स्वर्गीय रतनसिंह बाबुसिंह परदेशी चौक ते सेंट लॉरेन्स स्कूल येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिडको विभाग व युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोतील अनेक भागांमध्ये खड्ड्यांना हार व फुल वाहण्यात आले. वाहन चालकांना बुंदी वाटप करून खड्ड्यांचा निषेध करण्यात आला. 

यावेळी अमोल नाईक, मुकेश शेवाळे, संतोष भुजबळ, अक्षय परदेशी, विशाल डोके, कृष्णा काळे, हर्षल चव्हाण, अक्षय पाटील, विकी डहाळे, निलेश सानप, किरण राजवाडे, प्रीतम भामरे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : सिडकोत खड्ड्यांना हार, फुल वाहून राष्ट्रवादीचे अनोखे आंदोलन appeared first on पुढारी.