पिंपळनेर येथे पोलीस वाहनाला अपघात; चार कर्मचारी जखमी

पिंपळनेर, (साक्री) , पुढारी वृत्तसेवा : पिंपळनेर शहरातील जेटी पॉइंट समोर भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने पुढे असलेल्‍या पोलीस वाहनास पाठीमागून धडक दिली. या अपघातात चार पोलीस जखमी झाले आहेत. ही घटना रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

पिंपळनेर पोलीस स्टेशनची (एमएच १८-जी ७१७४) ही गाडी शुक्रवारी रात्री शेलबारी- पिंपळनेर रोडवर पेट्रोलिंग करीत असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या (एमएच १८-बीजी ६९६१) या डंपरने गाडीस जोरदार धडक दिली.

या अपघातात प्रकाश नथ्थू माळी (वय ३२),श्रीराम नानाभाऊ पदमोर (वय २८), निर्मल जीवन पवार(वय २४), सुनील पोल्या गावित (वय ३६)  हे पोलीस कर्मचारी जखमी झाले. सर्व जखमींना पिंपळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.या प्रकरणी कॉन्स्टेबल प्रकाश माळी यांनी याबात तक्रार दिली. यावरून पिंपळनेर पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे. डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा  :

The post पिंपळनेर येथे पोलीस वाहनाला अपघात; चार कर्मचारी जखमी appeared first on पुढारी.