पिंपळनेर : साक्री येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला 10 वर्षांची शिक्षा

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
साक्री तालुक्यातील ईच्छापूर येथील एका अल्पवयीन मुलीला परिचीत तरूणाने पेढा खाण्यास दिला. त्यानंतर झोपी गेलेल्या तरुणीचे अपहरणानंतर वाहनातच तिच्यावर बलात्कार करण्यात आला. तसेच एका निर्जनस्थळीही तिच्यावर अतिप्रसंग करण्यात आला .या गुन्ह्यात नराधमाला दोन साथीदारांनी साथ दिली. त्यामुळे संशयितासह दोघांवरही पोक्सोसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार मुलगी सायंकाळी वडिलांचा स्वयंपाक करत असताना दादू गुलाब कारंडे (२२, रा. धमणार,ता.साक्री) हा तिथे आला. त्याने मुलीला खाण्यासाठी पेढा दिला. तो पेढा खाल्ल्यानंतर मुलीला भोवळ आली. त्यानंतर ती मामीजवळ झोपी गेली. मात्र, तिचे डोळे उघडले, तेव्हा रात्रीचे चार वाजलेले होते. एका गाडीतून तिला नेले जात होते. यासंदर्भात दादूला जाब विचारला असता त्याने तिच्यावर वाहनात अतिप्रसंग केला. यावेळी एक जण गाडी चालवत होता. तर दुसरा मुलगाही वाहनातच होता. यानंतर दादू आणि त्या मुलीला उतरवून वाहन निघून गेले. यानंतर शेडमध्येही दादूने तिच्यावर जबरदस्ती केली. यानंतर तिथे दादूचा काका आला व त्याने तिची सुटका केल्याचे पीडितेने म्हटले आहे. दरम्यान, घटनेनंतर अत्याचार करणारा तरूण पसार झाला आहे. पोलिसांनी पीडितेच्या जाबवरुन तिघा संशयितांवर पोक्सोनुसार गुन्हा दाखल केला आहे. पीएसआय आर.व्ही.निकम पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : साक्री येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार appeared first on पुढारी.