पोलिसांना बघून पळ काढण्याचा प्रयत्न फसला, दुचाकी चोरांना अटक

दुचाकी चोराला अटक www.pudhari.news

पंचवटी : पुढारी वृत्तसेवानाशिक शहर व ग्रामीण हद्दीतील दुचाकी चोरी करणाऱ्या दोन संशयितांना ताब्यात घेण्यात पंचवटी गुन्हे शोध पथकास यश मिळाले असून, या संशयितांकडून विविध नऊ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपनीच्या १७ दुचाकी असा एकूण साडेअकरा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

पंचवटी परिसरात पोलिस गस्त घालीत असताना दोन संशयित विना नंबरप्लेट असलेली दुचाकी घेऊन मेरी ऑफिसमध्ये संशयास्पद प्रवेश करताना दिसून आले. त्यांना हटकले असता पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंचवटी गुन्हे शोध पथकांच्या कर्मचाऱ्यांनी संशयित यश राकेश मांडवडे ( १९, चवगाव, नामपूर, सटाणा) व प्रशांत एकनाथ गावित (१९ रा. बाबापूर, मावडी, दिंडोरी) यांना ताब्यात घेतले. या संशयितांची अधिक चौकशी केली असता त्यांनी पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली, दिंडोरी, वणी पोलिस ठाणे हद्दीतून दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली.

पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी गुन्हे शोध पथकाचे पोलिस हवालदार अनिल गुंबाडे, दीपक नाईक, कैलास शिंदे आदींनी कारवाई केली.

या दुचाकी केल्या हस्तगत

एच.एफ डिलक्स – ३, ड्रिम युगा – ३, स्प्लेंडर – ३, शाइन – ४, पल्सर एन.एस – १, सी.टी. १०० – १, ॲक्सेस १२५ – १, आय स्मार्ट – ०१ अशा जवळपास साडेअकरा लाख रुपयांच्या १७ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :

The post पोलिसांना बघून पळ काढण्याचा प्रयत्न फसला, दुचाकी चोरांना अटक appeared first on पुढारी.