बिबट्यांच्या जोडीचा शेतकरी भावंडावर हल्ला, दोघेही जखमी

बिबट्याचा हल्ला

सिन्नर(जि. नाशिक) पुढारी : वृत्तसेवा दोन शेतकरी भांवडांवर एकाचवेळी दोन बिबट्यांनी हल्ला केल्याची घटना सिन्नर तालुक्यातील नायगाव येथे घडली आहे. यात दोघेही भाऊ जखमी झाले असून उपचार घेण्यात आले आहेत. (Nashik Leopard Attack)

तालुक्यातील नायगाव येथे चव्हाण वस्तीवर शेतकरी विलास लोणकर (39) व त्यांचे बंधू  सुभाष लोणकर (41) रात्री साडे वाजेच्या दरम्यान मोटरसायकल वर येत असताना दोन बिबट्यांनी थेट त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यामध्ये लोणकर बंधू दोघेही जखमी झाले असून दोघांवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यात आले.

आतापर्यंत गेल्या काही महिन्यांत सलग 5 बिबट्यांना जेरबंद करण्यात आले आहे. बिबट्याच्या हल्ल्यात अनेक जण जखमीही झाले आहेत.  बिबट्यांना जेरबंद केल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता, मात्र या हल्ल्यानंतर शेतकरी परत भयभीत झाले आहे. ग्रामस्थांनी परत पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. वन अधिकारी गिते यांनी जागेवर जाऊन पाहणी केली. यापूर्वी नायगाव शिवारात महिनाभरात अनेक जणांवर हल्ला झालेला होता. त्या पार्श्वभूमीवर वनविभागाने पिंजरे लावले होते. त्यात पाच बिबटे जेरबंद झाले होते. त्यानंतरही बिबट्याने हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे.

हेही वाचा :

The post बिबट्यांच्या जोडीचा शेतकरी भावंडावर हल्ला, दोघेही जखमी appeared first on पुढारी.