बिबट्या नसून पट्टेदार वाघ असल्याचा दावा, त्र्यंबक तालुक्यातील घटना

त्र्यंबकेश्वर बिबट्या हल्ला,www.pudhari.news

नाशिक : त्र्यंबकेश्वर- तालुक्यातील पिंप्री येथे बिबट्याने एका महिला व पुरूषावर हल्ला केल्याची घटना गुरूवारी (दि.7) दुपारी चारच्या सुमारास घडली. काळू सोमा वाघ (45) हे शेतात गहू पिकाला पाणी भरत असताना तर ताराबाई विल मुर्तडक (35) या गोठ्यात शेण काढत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. यात दाेघे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान या हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या महिला आणि मुलांनी मात्र हा अंगावर पट्टे असलेला ढाण्या वाघ असल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे काळु वाघ यांच्यावर बिबटयाने झेप घेतली तेव्हा ते जमीनीवर पडले. मात्र त्याच वेळेस लोक धावले तसेच कुञ्यांनी कल्लोळ केल्याने बिबट्या सूसाट पळाला. यामध्ये काळु याच्या हाताला जखम झाली आहे. त्यानंतर काही अंतरावर असलेल्या वस्तीवरील घराच्या गोठयात शेणपाणी करत असलेली महिला ताराबाई यांच्यावर हल्ला केला. मात्र तेथील ग्रामस्थांनी आरडाओरडा करताच जवळच्या रानात पळुन गेला. यामध्ये ताराबाई यांना दुखापत झाली आहे.पायाला लागले आहे.

बिबटया पळत असताना….

घटनेची माहिती मिळताच पिंप्री गावातील ग्रामस्थांनी वस्तीवर धाव घेतली. जखमींना तातडीने त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. तेथून नाशिक येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. वन खात्याने तातडीने पिंजरा लावावा अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे. दरम्यान नाशिक वनपरिक्षेत्र अधिकारी वृषाली गाडे यांनी वाघ नसल्याचे म्हटले आहे. बिबटया पळत असतांना पट्टे असल्याचा भास होत असतो अशी माहिती त्यांनी दिली आहे. 

हेही वाचा :

The post बिबट्या नसून पट्टेदार वाघ असल्याचा दावा, त्र्यंबक तालुक्यातील घटना appeared first on पुढारी.