नाफेडद्वारे कांदा खरेदीस प्रारंभ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- केंद्र सरकार कांद्याचे भाव स्थिर ठेवताना सवलतीच्या दरात जनतेला तो उपलब्ध करून देण्यासाठी एनसीसीसएफ (नॅशनल को-आॅफ कन्झ्युमर्स फेडरेशन आॅफ इंडिया) व नाफेडमार्फत कांदा खरेदी करते आहे. तिसऱ्या फेजमध्ये एनसीसीएफने २ हजार ११३ मेट्रिक टन कांदा खरेदीची माहिती एनसीसीएफच्या व्यवस्थापकीय संचालक अनिस जोसेफ चंद्रा यांनी दिली. शहरामध्ये २५ रुपये किलोने कांद्यासह सवलतीत चणाडाळ व गव्हाचे पीठ उपलब्ध देण्याचा योजनेचा प्रारंभ चंद्रा यांनी केला.

केंद्र सरकारच्या किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत ग्राहक कल्याण मंत्रालयातर्फे ग्राहकांना विविध योजनांच्या माध्यमातून भारत चनाडाळ, भारत आटा व कांदा विक्री केली जाईल. योजनेचा प्रारंभ रविवारी (दि.१७) जोसेफ यांच्या हस्ते झाला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, केंद्र सरकारने एनसीसीएफ व नाफेडच्या माध्यमातून अंदाजे ५ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला आहे.

एनसीसीएफमार्फत देशातील विविध शहरांमध्ये सवलतीच्या दरात कांदा विक्री केली जाते. पुढच्या टप्प्यात नाशिकमध्ये मोबाइल व्हॅनद्वारे ग्राहकांना सवलतीच्या दरात कांदा देण्यात येईल. किरकोळ बाजारात कांद्याचे दर सध्या ३० ते ४० रुपये किलो आहे. एनसीसीएफ नागरिकांना १ ते २ किलोच्या किलोच्या पॅकिंगमध्ये २५ रुपये किलो दराने उपलब्ध करून देईल. तर ६० रुपये किलाेने चनाडाळ व २७ रुपये ५० पैसे किलो दराने गव्हाचे पीठ मिळणार आहे. शहरातील सहा विभागांत मोबाइल व्हॅनद्वारे ग्राहकांना या वस्तू दिल्या जातील, असे जोसेफ यांनी सांगितले. यापुढील टप्प्यात मूगडाळ व तांदूळही सवलतीत देण्याचा विचार असल्याचे जोसेफ यांनी नमूद केले. यावेळी जिल्हा उपनिबंधक फैयाज मुलानी आणि एनसीसीएफचे मॅनेजर परीक्षित उपस्थित हाेते.

तिसऱ्या फेजमध्ये खरेदी सुरू

एनसीसीएफने २ लाख ८९ हजार ८४८ मेट्रिक टन कांदा खरेदी केला. फेज १ मध्ये १ लाख ५० हजार १८ तसेच फेज २ मध्ये १ लाख ३७ हजार ७१४ मेट्रिक टन कांदा खरेदी केला आहे. तिसऱ्या टप्प्यातील कांदा खरेदी ९ डिसेंबरपासून नाशिक व नगर जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आली आहे. आजमितीस २ हजार ११६ मेट्रिक टन कांदा खरेदी केला असून, यापुढेही खरेदी सुरू राहील, अशी माहिती अनिस जोसेफ चंद्रा यांनी दिली.

हेही वाचा –

The post नाफेडद्वारे कांदा खरेदीस प्रारंभ appeared first on पुढारी.