ब्रेकिंग ! नाशिकमधून माझी पूर्णपणे माघार : छगन भुजबळांची घोषणा

छगन भुजबळ,www.pudhari.news

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क – नाशिक लोकसभा निवडणूकीच्या रिंगणातून छगन भुजबळ यांनी माघार घेतली आहे. नाशिकमधून मी माघार घेत असल्याची घोषणा छगन भुजबळ यांनी मुंबई येथे पत्रकारपरिषद घेऊन केली आहे. भुजबळांनी स्वत:च आपण माघार घेत असल्याचे सांगितल्याने त्यांच्या नाशिकमधून उमेदवारी विषयीच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. (Nashik Lok Sabha Chhagan Bhujbal)

भुजबळ म्हणाले, आम्ही नाशिकच्या जागेविषयी मागणी केली होती. समीर भुजबळांसाठी जागा मागितली होती. मात्र, अमित शहा म्हणाले तुम्ही असाल तरच ठीक आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही तेच सांगितलं. तुम्हीच नाशिकची जागा लढावावी अशा केंद्रातून सूचना असल्याचे सांगितले. गृहमंत्री अमित शहा यांनी माझ्यावर विश्वास दाखवून माझ्या नावाची शिफारस केल्याने मी त्यांचे धन्यवाद मानतो. माझे नाव चर्चेत आल्यानंतर सर्वच समाजातील बांधवांनी मला सपोर्ट केला, अगदी मराठा बांधवांनीही माझ्या नावाचे स्वागत केले. त्या सगळ्यांचे आभार मानत मी नाशिकमधून माघार घेत असल्याची घोषणा भुजबळांनी केली.

भुजबळ पुढे म्हणाले नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा प्रचार पुढे गेला आहे. महायुतीचा मात्र आजूनही तिढा कायम कायम. महायुतीकडून उशीर होत आहे. ताबडतोफ निर्णय घेण गरजेचं आहे, नाहीतर नुकसान होऊ शकतं. उगीच अडचण निर्णाण होईल त्यामुळे लवकर निर्णय घ्यायला हवा. समोरच्यांचा जोरात प्रचार सुरु झाला असल्याचे भुजबळ म्हणाले. दरम्यान छगन भुजबळ यांनी माघार घेतल्याने शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांचा मार्ग सुकर झाला आहे.