रात्री बिबट्या, दिवसा लोडशेडींग; विंचुरी दळवीचा शेतकरी दुहेरी संकटात

विंचुरी दळवीः पुढारी वृत्तसेवा- सिन्नर तालुक्यातील विंचुरी दळवी व परिसरात सोमवार ते बुधवार दिवसा विद्युत पंपांना येणारा थ्री फेज सप्लाय कमी दाबाने सोडला जातो आहे. त्यामुळे वारंवार विजेच्या तारा तुटण्याचा प्रकार होत आहे. सध्या परीसरात बटाटा व गहु कांदे ही पिके शेवटच्या टप्प्यावर असून पाण्याची गरज आहे. परंतु सततच्या लोडशेडींगमुळे पिके वाया जाता की काय अशी शेतकर्‍यांना भिती वाटत आहे. कुठलाही लोकप्रतीनिधी यावर आवाज उठवण्यास तयार नाही त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी दिसून येत आहे.

राञी थ्री फेज सप्लाय सुरळीत दिला जातो परंतु रात्री बिबट्याची भिती तर दिवसा लोडशेडींगची भिती अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. अधिकार्‍यांना फोन केला तर, आम्हाला तेवढीच कामे आहेत का अशा प्रकारची उलटसुलट ऊत्तरे दिली जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.  अशाप्रकारे अधिकारी वागत असतील तर शेतकर्‍यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशारा परीसरातील शेतकर्‍यांनी दिला आहे.

भगुर फीडर वरतुन विंचुरी दळवी व परीसराला विद्युत पंपांसाठी थ्री फेज सप्लाय दिला जातो. भगुर ते विंचुरी पर्यत विजपुरवठा सुरळीत दिला जातो परंतु विंचुरी दळवी व दोनवाडे परीसरात लोड जास्त असल्यामुळे सतत विद्युततारा तुटणे ही समस्या निर्माण होते. शेतकर्‍यांना वेठीस धरण्याची आमची भूमिका नसून आम्ही वेळोवेळी शेतकर्‍यांच्या अडचणी दुर करत असतो. येथून पुढे सुद्धा करु. राजेश चौहान(सहाय्यक अभीयंता, भगुर )

विज वितरणच्या सततच्या लोडशेडींगला शेतकरी वर्ग कंटाळला आहे. मात्र, एकही विजवितरणचा अधिकारी याची दखल घ्यायला तयार नाही. कमी दाबाने विजपुरवठा होत असल्याने वारंवार विज तारा तुटने हे प्रकार घडत असता. त्यामुळे विज पुरवठा खंडित करावा लागतो. विज पुरवठा जर उच्च दाबाने सोडला तर या समस्या दुर होण्यास मदत होईल व लोडशेडींगचा शेतकर्‍यांना सामना करावा लागणार नाही. बाळासाहेब भोर (सरपंच) विंचुरी दळवी

हेही वाचा :

The post रात्री बिबट्या, दिवसा लोडशेडींग; विंचुरी दळवीचा शेतकरी दुहेरी संकटात appeared first on पुढारी.