शिवसेना नेत्या शोभा मगर यांचे निधन

शिवसेनेच्या शोभा मगर यांचे निधन,www.pudhari.news

पंचवटी, नाशिक- शिवसेनेच्या माजी उत्तर महाराष्ट्र महिला आघाडी प्रमुख शोभा मगर यांचे मंगळवार (दि. २८) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांनी पंचवटीतील सूधर्म रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

शोभा मगर यांनी नाशिकमध्ये काळ गाजवला होता. शिवसेनेची सत्ता नसताना, अनेक आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभागी होत धुरा सांभाळली. त्या शिवसेनेच्या माजी जिल्हा प्रमुख सुनील बागुल यांच्या निकटवर्ती समजल्या जात होत्या.

शिवसेनेची सत्ता आणण्यात मगर यांचा खारीचा वाटा होता. त्यानंतर अनेक वर्ष त्या जिल्हाप्रमुख आणि नंतर महिला आघाडी प्रमुख होत्या. याच दरम्यान जेव्हा शिवसेनेत दोन गट पडले तेव्हा त्या शिंदे गटाच्या देखील पुन्हा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष होत्या. या काळात अनेक मोठ-मोठ्या आंदोलनाच्या अग्रभागी त्या होत्या. त्यांच्या पश्चात २ मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ता धीरज मगर यांच्या त्या मातोश्री होत.

हेही वाचा :

The post शिवसेना नेत्या शोभा मगर यांचे निधन appeared first on पुढारी.