शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून लाचखोर लिपीक एसीबीच्या जाळ्यात 

Jalgaon News

चाळीसगाव : येथील पाट बंधारे विभागातील एका लिपीकास लाचलुचपत विभागाच्या पथकाने 13 हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची जळगाव जिल्ह्यातील ही पाचवी कारवाई आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नांदगाव तालुक्यातील वेहेळगाव येथील तक्रारदार यांच्या आजोबाची शेत जमीन मन्याड धरणातून गाळ टाकण्यासाठी परवानगी मिळण्याकरिता आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून बारा शेतकऱ्यांनी उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभाग चाळीसगाव या ठिकाणी अर्ज केला होता. जेव्हा की शेतकऱ्यांना मन्याड धरणातून शासनाकडून मोफत गाळ देण्यात येतो. चाळीसगाव येथील उपविभाग विभागीय अभियंता पाटबंधारे उपविभाग या कार्यालयातील लिपिक तुषार अशोक पाटील यांनी तक्रारदाराकडे तेरा हजार तीनशे रुपयांच्या मागणीसाठी तगादा लावला.

वारंवार होणाऱ्या पैशाच्या मागणीला वैतागून धुळे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली असता या माहितीच्या आधारे धुळे लाचलुचपत विभागाने चाळीसगाव येथे जाऊन तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवर पडताळणी करून तुषार पाटील यांनी 13 हजार रुपयांची  मागणी केल्याचे सिद्ध झाल्याने भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे

परंतु पाटबंधारे विभागाकडून प्रति ट्रॅक्टर १२०० रूपये प्रमाणे ११ जणांकडून 13 हजार 300 रुपये मागणी होत असल्याची गुप्त माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. त्यावर सदर पथकाने आज सकाळी १०.४० वाजताच्या सुमारास सापळा रचून पाटबंधारे विभागातील लिपिक तुषार अशोक पाटील याला ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरू आहे. ही कारवाई धुळे विभागाचे पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे यांनी सापळा रचला. कारवाई सिंग चव्हाण, रूपाली खांडवी, राजन कदम, मुकेश अहिरे, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रवीण पाटील, प्रवीण मोरे, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली.

हेही वाचा :

The post शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून लाचखोर लिपीक एसीबीच्या जाळ्यात  appeared first on पुढारी.