शॉर्टसर्किट’मुळे घराला आग, साहित्यासह साडेतीन लाख जळून खाक

घराला आगwww.pudhari.news

देवळा : पुढारी वृत्तसेवा; येथील देवळा -खर्डे रस्त्यावरील शिंदे वाडीतील एका बंद घराला आज मंगळवारी (दि. १३) दुपारी १ वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागून घरातील रोख रक्कम ३ लाख ६० हजार रुपयांसह घरातील संसार उपयोगी असे एकूण १४ लाख १५ हजार रुपये किमतीचे साहित्य जळून खाक झाले.

देवळा नागरपंचातीचे अग्निशमन बंब वेळेत पोहचल्याने कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली व पुढील अनर्थ टळला. याबाबत सविस्तर माहिती अशी की मंगळवारी (दि. १३) रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास देवळा येथील शिंदे वाडीत राहणारे विनोद बाजीराव शिंदे यांच्या बंद घराला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. यावेळी घरातून धूर येत असल्याचे आजूबाजूला राहणाऱ्या लोकांच्या लक्षात येताच घटनास्थळी स्थानिक व इतरांनी धाव घेतली. वीज वितरण कंपनीला याची कलपना दिल्यावर येथे तत्काळ वीजपुरवठा खंडित करण्यात आला. यावेळी  सामाजिक कार्यकर्त्यांनी लागलीच स्वयंपाक घरातील गॅस सिलेंडर बाहेर काढून आग विझविण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी देवळा नागरपंचातीचे अग्निशमन बंब वेळेत पोहचल्याने आग आटोक्यात आली व पुढील अनर्थ अनर्थ टळला.

घरात आगीने रौद्र रूप धारण केल्याने घरातील रोख रकमेसह मौल्यवान वस्तू यात जळून खाक झाल्याने शिंदे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या आगीत रोख रक्कम ३ लाख ६० हजार रुपये, सोने १ लाख ८० हजार, संसार उपयोगी वस्तू ५ लाख, टीव्ही ४५ हजार, फर्नीचर १ लाख ५० हजार, सिलिंग व पियूईपी ४० हजार, लोखंडी कपाट ६० हजार, फ्रिज, फॅन आदी ५० हजार, पलंग ३० हजार असे एकूण १४ लाख १५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे . या घटनेचा देवळ्याचे तलाठी उमेश गोपनारायण यांनी पंचनामा केला आहे.

या घटनेमुळे देवळा शहर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात आली आहे. याकामी नगराध्यक्ष मनोज आहेर, माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर, लक्ष्मीकांत आहेर,  गटनेते संजय आहेर, किशोर आहेर, प्रदीप आहेर, राजेंद्र आहेर आदींसह नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

हेही वाचा :

The post शॉर्टसर्किट'मुळे घराला आग, साहित्यासह साडेतीन लाख जळून खाक appeared first on पुढारी.