संसारोपयोगी साहित्य मिळणार; राज्यातील दहा लाख महिलांना मिळणार लाभ

नाशिक : जिजा दवंडे

घरोघर काम करून आपल्या कुटुंबांचा उदरनिर्वाह करणाऱ्या घरेलू (मोलकरणी Domestic workers) कामगारांच्या संसाराला हातभार लावण्यासाठी कामगार कल्याण मंडळ (Labor Welfare Board) सरसावले असून, या कामगारांना संसारोपयोगी साहित्य वाटप करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा लाभ राज्यातील 10 लाख, तर नाशिक जिल्ह्यातील 25 हजारांपेक्षा अधिक नोंदणीकृत घरेलू कामगारांना होणार आहे.

राज्यात कामगार आयुक्त कार्यालयामार्फत कल्याणकारी योजना राबविण्यासाठी कामगार कल्याण मंडळाची (Labor Welfare Board) स्थापना करण्यात आलेली आहे. या मंडळामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. यापूर्वी इमारत व बांधकाम कामगार मंडळाकडून राबविण्यात आलेल्या साहित्य वाटप योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर याच धर्तीवर विकास आयुक्त (असंघटित कामगार) यांच्याकडून घरेलू कामगार (मोलकरणी Domestic workers) यांच्यासाठी संसारोपयोगी साहित्य वाटप करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला होता. याला शासनाने मंजुरी दिल्याने आता घरेलू कामगारांसाठी (मोलकरणी) (मोलकरणी Domestic workers) संसारोपयोगी साहित्य (भांडी) भेटवस्तू वाटप करण्यात येणार आहेत. यामध्ये घरात वापरासाठी लागणाऱ्या सर्वच साहित्यांचा समावेश आहे. या योजनेचा लाभ जिल्हास्तरीय कार्यालयामार्फत घरेलू कामगारांना दिला जाणार आहे. यापूर्वी कामगार कल्याण मंडळाकडून मोलकरणींसाठी प्रसूतीदरम्यान पाच हजार रुपये तसेच मृत्यूपश्चात वारसांना तत्काळ दोन हजार रुपये अनुदान देण्याची योजना राबविली जात आहे. तसेच कोरोना काळात वय वर्ष 55 पूर्ण झालेल्या घरेलू कामगाराच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे दहा हजार रुपये देण्यात आले होते. आता या नवीन योजनेमुळे घरेलू कामगारांच्या (मोलकरणी Domestic workers) संसाराला काहीसा हातभार लागणार आहे. (Labor Welfare Board )

शासनाकडून घरेलू कामगार, मोलकरणींना संसार साहित्य वाटप करण्याची योजना प्रभावीपणे राबविली जाणार आहे. त्यासाठी लवकरच प्रक्रिया सुरू केली जाईल. नोंदणीकृत कामगारांना या योजनेचा लाभ मिळेल. कोणीही वंचित राहणार नाही, याची काळजी घेतली जाईल. – विलास माळी, कामगार उपायुक्त, नाशिक.

घरेलू, मोलकरणी कामगारांना पेन्शन, राहण्यासाठी हक्काचे घर, मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. याबाबत शासनाने निर्णय घेण्याची गरज आहे. संसाराची भांडी देण्याचा निर्णय योग्य असला तरी इतरही महत्त्वाचे निर्णय मार्गी लागले पाहिजे. – राजपालसिंग शिंदे, लोकराज्य घरेलू कामगार संघटना, नाशिक.

The post संसारोपयोगी साहित्य मिळणार; राज्यातील दहा लाख महिलांना मिळणार लाभ appeared first on पुढारी.