22 जानेवारीला आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊ

Uddhav Thackeray

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क; उद्धव ठाकरे यांना 22 जानेवारीला अयोद्धेत होणाऱ्या राम मंदिर उद्धघाटनाचे निमंत्रण अद्याप मिळालेले नाही. त्यावर राम मंदिराच्या उद्धघाटनाचे निमंत्रण केवळ रामभक्तांनाच मिळणार असल्याचे मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येन्द्र दास यांनी म्हटले होते. तसेच भाजपच्या गिरीश महाजन यांच्यासह अनेकांनी उद्धव यांना निमंत्रण देण्यावरुन टीका केली होती.

आता, उद्धव ठाकरे यांनी त्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 22 जानेवारीला आम्ही नाशिक येथे जाणार आहोत, तिथे श्री काळाराम मंदिर आहे. बाबासाहेब आंबेडकर व सानेगुरुजी यांनी या मंदिर प्रवेशासाठी संघर्ष केला होता. राममंदिर आमचेही आहे हे सांगण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. आम्ही काळाराम मंदिरात जाऊ व सायंकाळी तेथेच गोदाआरती करणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.

उद्धव ठाकरे म्हणाले, प्रभू राम वनवास काळात पंचवटीत होते, हे पावित्र्य लक्षात घेऊन आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊन संध्याकाळी साडे सातला गोदा आरती करणार आहोत. त्यानंतर 23 जानेवारीला  बाळासाहेबांचा जन्मदिवस आहे. त्यानिमित्त नाशिकला शिवसेनेचे अधिवेशन होईल. संध्याकाळी गोल्फ क्लब मैदानावर जाहीर सभा घेणार असल्याची माहितीही उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. दरम्यान 1995 ला नाशिकमध्ये शिवसेनेचे अधिवेशन झाले होते. त्यानंतर शिवसेनेची सत्ता आली होती.  त्याच धर्तीवर नाशिकमध्ये पुन्हा शिवसेनेचे अधिवेशन होते आहे.

हेही वाचा :

The post 22 जानेवारीला आम्ही नाशिकच्या काळाराम मंदिरात जाऊ appeared first on पुढारी.