Nashik Crime : वर्षभरात गुन्हेगारीत ३३ टक्के वाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शहरात मागील वर्षात चौदा पोलिस ठाण्यांमध्ये ५ हजार ७७४ गुन्हे दाखल झाले आहेत. तर २०२२ मध्ये ४ हजार ४५५ गुन्हे दाखल झाले हाेते. त्यामुळे २०२२ च्या तुलनेत मागील वर्षात दाखल गुन्ह्यांमध्ये ३३ टक्क्यांची वाढ झाली आहे.

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी १३ पोलिस ठाण्यांवर असून ऑनलाइन फसवणूकीवर आळा घालण्यासाठी सायबर पोलिस ठाणे कार्यरत आहेत. अपघात, खुन, खुनाचा प्रयत्न, मारहाण, चोरी, घरफोडी, जबरी चोरी, फसवणूक, दरोडा, छळ, बलात्कार, विनयभंग, अपहार आदी गुन्हे घडल्यानंतर त्यांची संबंधित पोलिस ठाण्यात नोंद होत असते. त्यानुसार गत वर्षभरात शहरातील १४ पोलिस ठाण्यामंध्ये ५ हजार ७७४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी खुन, खुनाचा प्रयत्न, मारहाण आदी शरीराविरोधातील बहुतांश गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. तर चोरी, जबरी चोरी, घरफोडी, अपघातांसारखे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना अपेक्षीत यश मिळालेले नसल्याचे चित्र आहे. सन २०२२ मध्ये शहरात ४ हजार ४५५ गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर २०२३ मध्ये एकूण दाखल गुन्ह्यांची संख्या ३३ टक्के वाढली आहे.

मनुष्यबळाचा प्रश्न

सद्यस्थितीत शहराची कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी २४६ पोलिस अधिकारी, २ हजार ९४६ पोलिस कर्मचारी व ६७ कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर आहे. मात्र शहरातील लोकसंख्ये व विस्ताराचा विचार करता हे मनुष्यबळ कमी पडते. वाढत्या गुन्ह्यांची संख्या लक्षात घेता आयुक्तालयात अतिरीक्त पोलिस आयुक्तपदासह इतर मनुष्यबळ आणि शहराची हद्द वाढवण्याची मागणी होत आहे.

पोलिस ठाणे २०२३ २०२२
पंचवटी 607 526
मुंबईनाका 491 390
सरकारवाडा 343 217
भद्रकाली 439 390
अंबड 810 623
इंदिरानगर 383 220
नाशिकरोड 636 407
म्हसरुळ 281 233
उपनगर 480 359
सातपूर 375 326
देवळाली कॅम्प 194 146
गंगापूर 321 257
आडगाव 349 336
सायबर 65 25

हेही वाचा :

The post Nashik Crime : वर्षभरात गुन्हेगारीत ३३ टक्के वाढ appeared first on पुढारी.