Accident : शिर्डी-भरवीर समृद्धी महामार्गावर १७ दिवसांत सहा जणांचा अपघाती मृत्यू

समृद्धी महामार्ग अपघात,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात तयार झालेल्या शिर्डी भरवीर मार्गाचे २६ मे रोजी उद्घाटन झाले. त्यानंतर या मार्गावर झालेल्या अपघातांमध्ये (Accident) सहा जणांचा मृत्यू झाला असून, इतर जखमी झाले आहेत. त्यामुळे वेगवान मार्गांवर अपघात आणि अपघाती मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने तो चिंतेचा विषय बनला आहे.

राज्याच्या विकासात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे योगदान वाढले आहे. नागपूर ते मुंबई असा १८ तासांचा प्रवास समृद्धीमुळे ८ तासांत शक्य होत आहे. त्यामुळे वाहनांचा वेग वाढल्याने अपघातांची भीतीही सर्वाधिक वाढली आहे. ११ डिसेंबर २०२२ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत या महामार्गावर अपघातांमध्ये ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४३ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्याचप्रमाणे २६ मे रोजी लोकार्पण झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील शिर्डी-भरवीर मार्गावर आत्तापर्यंत किमान पाच अपघात झाले असून, त्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. ३ जून रोजी झालेल्या अपघातात २, तर १२ जून रोजी झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासनास उपाययोजना वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.

समृद्धी महामार्गावरील अपघाताची (Accident)  कारणे

वाहनांचे टायर फुटणे, चालकास झोप लागणे, वाहनांमधील तांत्रिक बिघाड, वेगवान वाहने, प्राणी रस्त्यात आडवे येणे, चुकीच्या दिशेने वाहने चालवण्यामुळे अपघात झाल्याचे निरीक्षण महामार्ग पोलिसांनी नोंदवले आहे.

हेही वाचा :

The post Accident : शिर्डी-भरवीर समृद्धी महामार्गावर १७ दिवसांत सहा जणांचा अपघाती मृत्यू appeared first on पुढारी.