पक्षाच्या स्थापनेनंतर प्रथमच नाशिकमध्ये मनसेचा वर्धापन दिन

नाशिक : ऑनलाइन डेस्क

आगामी लोकसभा निवडणूक – २०२४ च्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये दिग्गजांचे दौरे सुरु असून त्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) राज्यस्तरीय मेळावा नाशिकमध्ये आयोजित करण्यात आला आहे. मनसे पक्षाच्या स्थापनेनंतर प्रथमच नाशिकमध्ये मनसेचा भव्य वर्धापन दिन पार पडणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे नाशिकच्या काळा रामाचे दर्शन घेऊन प्रभू श्रीरामाची आरती देखील करणार आहेत.

नाशिकमध्ये युवादिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नाशिक दौऱ्यावर होते. तर सोमवार, दि. 22 जानेवारीला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली. त्यानंतर राज ठाकरे यांनी देखील नुकताच १ फेब्रुवारीला नाशिकचा दौन दिवसीय दौरा केला. यादरम्यान त्यांनी येथील मनसेच्या पदाधिकाऱ्यांना निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मूलमंत्र दिला. पत्रकार परिषद घेऊन राज ठाकरे म्हणाले होते की, सध्या मतदारसंघात चाचपणी सुरु असून पक्षातर्फे प्रत्येक मतदारसंघातून निवडणूक लढवली जावी असे लोकांचे म्हणणे आहे.  दोन अडीच महिन्यांपासून आमची लोकं मतदारसंघात जाऊन येत आहेत. माहिती घेत आहेत. कुठे निवडणूक लढवली पाहिजे. कुठे नाही, या संदर्भात चाचपणी सुरु असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले होते.

आता पुन्हा एकदा राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर येत  असून एकेकाळी नाशिकची मनसेचा (MNS) बालेकिल्ला म्हणून पुढेही ओळख राहण्यासाठी आगामी लोकसभा (Lok Sabha Election 2024) व विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election) नाशिकमधूनच निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याचा निर्णय मनसेकडून घेतले जाणार आहे.

तर तीन दिवस नाशिकमध्ये ‘मनसे’मय वातावरण
निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये मनसेचे दि. ७, ८ आणि ९ मार्चला कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून गुरुवार, दि. ७ मार्चला पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे नाशिकमध्ये आगमन होणार आहे. तर शुक्रवार, दि. ८ मार्चला सकाळी मनसे पक्षात काही जणांचा प्रवेश होणार आहे. त्यानंतर शनिवार, दि. ९ मार्च रोजी मनसेच्या वर्धापनदिनी दादासाहेब गायकवाड सभागृहात पक्षाचा राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षाचे राज्यभरातील प्रमुख नेते या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.

The post पक्षाच्या स्थापनेनंतर प्रथमच नाशिकमध्ये मनसेचा वर्धापन दिन appeared first on पुढारी.