Jalgaon Crime : तीन गुन्हेगारांवर स्थानबध्दची कारवाई

न्यायालय

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जळगाव तालुका, पहूर पोलीस ठाणे व भुसावळ बाजारपेठ अंतर्गत नोंद असलेल्या तीन गुन्हेगारांवर एम पी डी ए अंतर्गत कारवाई करून त्यांना स्थानबद्ध करण्यात आलेले आहे.

जिल्हा पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जळगाव तालुका पोलीस ठाणे हद्दीतील आरोपी राकेश मधुकर कोळी (वय २७ रा. भोलाणे ता.जि. जळगाव) याचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदया अंतर्गत ६ गुन्हे दाखल आहेत. पहूर पोलीस स्टेशन हद्दीतील आरोपी हुसेन सरदार तडवी (वय ४३ रा. चिलगाव ता. जामनेर जि. जळगाव) याचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदया अंतर्गत १६ गुन्हे दाखल आहेत. वरील दोन्ही इसमाविरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले व औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतीचे विना परवाना प्रदर्शन व्यक्ती (व्हिडीओ पायरेट) वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे. आलेल्या प्रस्ताव यावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी राकेश कोळी यास स्थानबध्द आदेश पारीत केला आहे. त्यास मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर तर हुसेन तडवी यास स्थानबध्द आदेश पारीत करुन त्यास मध्यवर्ती कारागृह, ठाणे येथे दाखल करण्यासाठी रवाना करण्यात आले आहे.

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील आरोपी सुरज अशोकराव भोगे ऊर्फ भांगे (वय २४ रा.पापा नगर, राणी मोहल्ला, भुसावळ) याच्या विरुध्द ७ गुन्हे दाखल आहेत. तर भांगे विरोधात धोकादायक व्यक्ती या मध्ये प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, यांनी स्थानबध्द आदेश पारीत करून मध्यवर्ती कारागृह, मुंबई येथे दाखल करण्याची कार्यवाही केली आहेे.

एम.पी.डी.ए. प्रस्ताव हे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, जळगाव अशोक नखाते, अपर पोलीस अधीक्षक चाळिसगाव कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, जळगाव संदिप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी, भुसावळ कृष्णांत पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी पाचोरा धनंजय वेरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांच्या पथकाने काम पाहिले.

The post Jalgaon Crime : तीन गुन्हेगारांवर स्थानबध्दची कारवाई appeared first on पुढारी.