Nashik : खिडकीचे गज कापून, सेफ्टी डोअर तोडून घरफोडी

घरफोडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील हिरावाडी व कैलास नगर परिसरात चोरट्यांनी खिडकीचे गज कापून व सेफ्टी डोअर तोडून घरफोडी करीत सुमारे साडे तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. याप्रकरणी पंचवटी व आडगाव पोलिस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

गायत्री अविनाश बस्ते (रा. हिरावाडी) यांनी पंचवटी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याने ३ ते ४ डिसेंबर दरम्यान खिडकीचे गज कापून त्यावाटे घरात शिरला. घरातील सोन्याचांदीचे दागिने, रोकड व संगणक असा एक लाख ९२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. याप्रकरणी पंचवटी पोलिस तपास करीत आहेत.

तर दुसऱ्या घटनेत भरत बारकू फड (२९, रा. कैलास नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याने ३ ते ४ डिसेंबर दरम्यान घराचे कुलूप तोडून घरातील रोकड व सोन्याचे दागिने त्याचप्रमाणे फड यांच्या शेजारी राहणारे राजेश लाटे यांच्या घराचे सेफ्टी डाेअर तोडून त्यांच्या घरातील किंमती ऐवज लंपास केला. सोयाबीन विक्री करून आलेले एक लाख ३० हजार रुपयांची रोकड, १४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, टीव्ही असा एकूण एक लाख ७८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्याने दोन्ही घरातून लंपास केला आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post Nashik : खिडकीचे गज कापून, सेफ्टी डोअर तोडून घरफोडी appeared first on पुढारी.