Nashik : लिलाव नाकारल्याने शेतकऱ्याने रस्त्यावर ओतले कांदे

nashik lasalgaon, कांदा फेकला रस्त्यावर

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा

चांदवड तालुक्यातील कोलटेक पाटे येथील दोन शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला तीस क्विंटल कांद्याचा व्यापाऱ्यांनी लिलाव न पुकारल्याने या दोघा शेतकऱ्यांनी सायंकाळी घरी जाताना बाजारसमितीसमोर रस्ताच्या बाजूला फेकून देत आपला संताप व्यक्त केला.

सचिन गांगुर्डे आणि रवी तळेकर यांनी शेवटच्या टप्प्यात असलेला दोन नंबरचा प्रतवारी केलेला तीस क्विंटल लाल कांदा ट्रॅक्टरमध्ये भरून लासलगाव बाजार समितीत दुपारच्या सत्रात विक्रीसाठी आणला होता. लिलावाला सुरुवात होताच ट्रॅक्टरजवळ आलेले व्यापारी सरळ पुढे निघून गेल्याने रवी तळेकर यांनी आपण माझ्या लाल कांद्याचा लिलाव का केला नाही?, अशी विचारणा व्यापाऱ्यांना केली असता या कांद्याला ग्राहक नसल्याचे कारण देत व्यापाऱ्यांनी तो खरेदी करण्यास नकार दिला.

आपल्या कांद्याचा लिलाव न झाल्याने घरी नेऊन घरच्यांची बोलणे ऐकण्यापेक्षा बाजार समितीच्या आवाराबाहेर काही अंतरावर बायपास रस्त्याच्या कडेला संध्याकाळी घराकडे जाताना ओतून आपला संताप व्यक्त केला. शेतकरी रवी तळेकर यांनी व्यापाऱ्यांच्या या वृत्तीवर प्रचंड टिका केली.

हेही वाचा : 

The post Nashik : लिलाव नाकारल्याने शेतकऱ्याने रस्त्यावर ओतले कांदे appeared first on पुढारी.