Nashik Crime : हाणामारी भोवली, शहरातील २० गुन्हेगार तडीपार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मार्च महिन्यात वर्चस्ववादातून बजरंगवाडी येथे दोन गटांत झालेल्या हाणामारीत दोन तरुण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामधील २० गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. परिमंडळ एकचे पोलिस उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार केला होता.

१५ मार्च २०२३ रोजी मुंबई नाका पोलिसांच्या हद्दीतील बजरंगवाडी परिसरात रात्री सव्वादहाच्या सुमारास दोन गटांत तुफान हाणामारी झाली. गर्दी पांगवण्यासाठी उपआयुक्त किरणकुमार चव्हाण यांसह सहायक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ, वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज पत्की यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तेव्हा संशयितांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली. या दंगलीत दोन तरुण जखमी झाले. या दगडफेकीत परिसरातील काही घरांचेही नुकसान झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी सर्व संशयितांना ताब्यात घेतले होते. २६ संशयितांविरोधात गुन्हा दाखल असून, त्यात ४ विधीसंघर्षित बालकांचाही समावेश आहे. तर दोन संशयित आता मध्यवर्ती कारागृहात आहेत. गुन्ह्यातील २० संशयितांविरोधात तडीपारीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यास पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी मान्यता दिल्याने २० जणांना तडीपार करण्यात आले.

तडीपारांची नावे …

संशयित मंगेश हिरामण जाधव (२४), विशाल सोमनाथ गाढवे (२४), राहुल भीमराज जाधव (२०), सरोज शेरू शेख (२२), रवि सोमनाथ गाढवे (२८), कुणाल दौलत जाधव (२१), प्रकाश श्रीराम सोमवंशी (२७), रूपेश मधुकर पिठे (१९), लखन पंडित ठाकरे (३०) आणि निवृत्ती हरिभाऊ जाधव (३९, सर्व रा. शनिचौक, बजरंगवाडी), संकेत ऊर्फ दाद्या नंदू तोरडमल (२१), चेतन गोपाळ जाध‌व (२४), प्रकाश रमेश शिंगाडे (२०), रोहन ऊर्फ रामप्रसाद शर्मा (२०), राहुल अशोक ब्राह्मणे (२४), आदित्य सुनील गायकवाड ऊर्फ टग्या मोरे (२०), अल्तमश जावेद शेख (१९), प्रसाद ऊर्फ परशा नंदू पवार (१९) आणि पवन विष्णू खाने (२२, सर्व रा. संताजीनगर, बजरंगवाडी) यांना तडीपार करण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post Nashik Crime : हाणामारी भोवली, शहरातील २० गुन्हेगार तडीपार appeared first on पुढारी.