सिडको : पुढारी वृत्तसेवा – लोकसभा निवडणुकीचे मतदान होताच सिडको भागात पुन्हा गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. वाहने जाळणे व काचा फोडण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. अज्ञात टवाळखोरांनी तोरणानगर परिसरात ऑटो रिक्षा जाळण्याचा प्रयत्न केला, तर शांतीनगर भागात कारच्या काचा फोडल्या.
बुधवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास मोहन शंकर लाखे (२७. रा. गणेश चौक) हे आपल्या नातेवाईकांच्या घरी तोरणानगर येथे आले होते. त्यांनी घराबाहेर ऑटो रिक्षा (एमएच १५ जे ए १२६३) ही उभी केली होती. यावेळी अज्ञात दोन ते तीन जणांनी घरातील एका सदस्याकडे पाणी मागितले. तेव्हा तुम्हाला ओळखत नसल्याचे सांगितल्याचा राग येऊन तिघांनी काही वेळात रिक्षाची काच फोडून रिक्षा जाळण्याचा प्रयत्न केला. तोडफोडचा आवाज एेकून स्थानिकांनी धाव घेत आग विझवली. तोपर्यंत रिक्षाचे हूड जळाले होते. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दुसरीकडे शांतीनगरमध्ये एका कारच्या काचा फोडण्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून वाढत्या गुन्हेगारीचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
हेही वाचा: