Nashik News : कीटकनाशकाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांना बेड्या

कीटकनाशकाची बेकायदेशीर विक्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; कीटकनाशकाची बेकायदेशीर विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या तीन भामट्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दिंडोरी रोडवरील साई मंदिराजवळ हा प्रकार सुरू असल्याची बाब कृषी अधिकाऱ्यांना समजल्यावर त्यांनी संबंधितांविरोधात पोलिसांत फिर्याद देत हा प्रकार उघडकीस आणला.

कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना कीटकनाशकांची विक्री केली जात असल्याची माहिती कृषी अधिकारी कार्यालयास मिळाली होती. त्यानंतर जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक तथा कीटनाशक निरीक्षक जगन भावराव सूर्यवंशी यांनी या घटनेची माहिती घेत पंचवटी पोलिसांत याबाबतची फिर्याद नोंदविली. पोलिसांनी ज्ञानेश्वर पंढरीनाथ चित्ते (४१, रा. पांडाणे, ता. दिंडोरी), महेश प्रकाश टर्ले (३२, रा. श्री जानकी लॉन्ससमोर, शिंपी टाकळी फाटा, चांदोरी, ता. दिंडोरी) व युवराज दुगजे या संशयितांसह अज्ञात उत्पादक व पुरवठादारावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यांच्याकडून वेगवेगळ्या कंपनीचे तब्बल तीन लाख ४८ हजार ६२० रुपये किमतीची कीटकनाशके हस्तगत केली असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post Nashik News : कीटकनाशकाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्यांना बेड्या appeared first on पुढारी.