चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क

नरकोळ (जि.नाशिक) : ग्रामीण भागातील जनजीवन शहरी भागापेक्षा फार वेगळे आहे. त्यामध्ये राहणीमान, जेवणपद्धती यामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल दिसून येतो. आता हिवाळा सुरू असून रोजच्या आहारात सर्वात श्रेष्ठ मानली जाणारी बाजरीच्या भाकरीला पसंती असून गॅस पेक्षा चुलीवरच्या भाकरीला ग्रामीण भागात आजही पसंती दिली जात आहे, शहरी भागातील जनतेला ग्रामीण भागातील चुलीवरच्या बाजरीच्या भाकरीचे आकर्षण लागले आहे.

ग्रामीण भागात आजही चुलीवरच्या भाकरीला पसंती

हिवाळा म्हटला की, बरेच जण उबदार व पौष्टिक आहाराचे सेवन करतात. काहीजण काजू, बदामला प्राधान्य देतात. परंतु ग्रामीण भागात इतक्या महागड्या खाद्याला, लोकांकडून पसंती दिली जाते. परंतु हिवाळ्यात ग्रामीण भागातील शेतकरीवर्ग ऊब तयार व्हावी, यासाठी काही धान्याची निवड करतात. त्यामध्ये उडीद, बाजरी, ज्वारी आदी धान्याचा समावेश असतो. परंतु शेतकरीवर्गाला हिवाळ्यात ऊब देणारी भाकरी म्हणजे चुलीवरची खरपूस बाजरीची भाकर. बाजरीची भाकर ग्रामीण भागात अत्यंत महत्त्वाची मानली जाते. महिला तीन दगडांची चूल अथवा मातीपासून तयार केलेली चूल यावर मोठा तवा ठेवून लाकडी परातीमध्ये बाजरीचे पीठ मिसळून गरम गरम बाजरीची भाकर तयार करतात. विशेष म्हणजे चुलीवरच्या भाकरीवर जो पापुद्रा येतो त़ो खाण्याची मजा काही वेगळाच आनंद देऊन जातो.

भविष्यात बाजरी मिळणे कठीण?

सध्या फक्त ग्रामीण भागातच चूल पाहायला मिळते. शहरी भागात मातीच्या चुलीची जागा गॅसने घेतल्यामुळे शहरातील महिला चुलीवरची भाकरी बनविणे तर सोडा; पण त्या खाणेसुद्धा पसंत करीत नाहीत. खेड्यात बाजरीच्या भाकरीला हिवाळ्यात सुगीचे दिवस येतात. कारण थंडीत मोठ्या प्रमाणात ऊब बाजरीच्या भाकरीतून मिळत असल्याने बळीराजा या भाकरीला मोठ्या प्रमाणावर पसंती देत असतो. परंतु बाजरीची भाकर खाण्यामागचे विज्ञान समजल्यामुळे आता शहरी भागातील जनतेला ग्रामीण भागातील चुलीवरच्या गरम गरम बाजरीच्या भाकरीचे आकर्षण वाटू लागले आहे. शेतकऱ्यांकडून बाजरीचे पीक घेण्याच्या प्रमाणातही दिवसेंदिवस घट होऊ लागल्याने भविष्यात बाजरी मिळणे कठीण होते की काय, असा प्रश्न निर्माण होऊ पाहत आहे.

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

भाकरीबाबत अजून काही>>>

-बाजरी मध्ये मॅग्रोशियम व फाॅस्फरस सारखा पोषक घटक असतो 

बाजरी हिवाळ्यात शरीर उबदार ठेवते

बाजरी कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यात मदत करते,

-बाजरीची भाकरी खाल्ल्या लवकर भूक लागत नाहीं

-हॉटेल धाब्यावर बाजरीच्या भाकरीबरोबर मटणाला चांगलीच पसंती मिळते,

-बाजरी ही उत्तम उर्जी स्ञोत आहे,बाजरीत गहू, तांदूळ यापेक्षा अधिक उर्जा आहे,

-प्रथिने जीवनसत्त्वे कॅल्शियम जीवनसत्त्व बी,6 अधिक आहे,

-एकेकाळी कोरडवाहू पिकामध्ये बाजरी होते होती,आता दिवसेंदिवस शेतीत आमुग्रह बदल होत असल्यामुळे बागायती क्षेत्रात विशेष उन्हाळी पीक म्हणून या पिकाकडे पहिले जाते परंतु गावरान बाजरी मिळणे दुरापास्त झाले आहे,

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

बाजरीच्या भाकरी बाबत सर्वांना अधिक उत्सुक या असते रोज पाच पकवान आहारात समावेश केला तरी भाकरीची आठवण आल्याशिवाय राहत नाही इतके महत्त्व बाजरीच्या भाकरीला आहे,- तात्या काकडे केरसाणे

 

Continue Reading चुलीवरच्या भाकरीची बातच लई न्यारी! फायदे वाचून व्हाल थक्क

Gram Panchayat Results : इगतपुरीत शिवसेनेची जोरदार मुसंडी! प्रस्थापितांना धक्का

इगतपुरी शहर (नाशिक) : तालुक्यात आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे आश्‍चर्यकारक निकाल लागले. ज्या ग्रामपंचायतींच्या निकालाकडे लक्ष लागले होते त्या पंचायतीत प्रस्थापितांना धक्का बसला. तालुक्यातील आठपैकी पाच ग्रामपंचायतीत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली. तहसीलदार कार्यालयात तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (ता.१८) मतमोजणी प्रसंगी उमेदवारांच्या समर्थकांची मोठी गर्दी होती. कोण बाजी मारणार, गावाच्या राजकारणात कोण ठरणार बाजीगर, याबद्दल उत्कंठा होती. 

विजयी उमेदवारांत युवकांचा भरणा अधिक

संवेदनशील तळोघ ग्रामपंचायतीत आश्चर्यकारक निकाल लागताच जल्लोष करण्यात आला. पंचायत समिती शिवसेनेचे गटनेते विठ्ठल लंगडे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने ९ पैकी ९ जागांवर बाजी मारत विरोधकांना नेस्तनाबूत केले. विजय जाहीर होताच तळोघ उमेदवार, समर्थक व ग्रामस्थांनी घाटनदेवी येथे जाऊन विजयाचा नारळ वाढवून आनंदोत्सव साजरा केला. शेणवड खुर्द ग्रामपंचायतीत माजी आमदार शिवराम झोले यांचे समर्थकांचे पॅनल नेस्तनाबूत झाले. विजयी उमेदवारांत युवकांचा भरणा अधिक होता. महिलांचाही सहभाग चांगला होता. मात्र, गावपातळीवर सर्वच ठिकाणी युवकांचे नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. तर टिटोली ग्रामपंचायतची बिनविरोध पार पडली होती. 

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

ग्रामपंचायत व विजयी झालेले उमेदवार 

तळोघ : भारत भगत, सुरू भगत, सपना लंगडे, संतू भगत, जनार्धन लंगडे, ताईबाई भगत, भगीरथ कडू, शीतल भगत, हिराबाई गोईकने. 
कुर्नोली : मदन तेलम, वनिता जोशी, रंगनाथ जोशी. 
बलायदुरी : हिरामण दुभाषे, ज्योती भगत, आश्विनी भगत. 
शेणवड खुर्द : केशव वारघडे, चंदा वारघडे, सीता वारघडे, योगेश दराने, कोमल वारघडे, नीलेश गवारी, ज्योती ढगे. 
गरुडेश्वर : संपत पोटकुळे, निर्मला पोटकुले, श्रीराम बोटे, रेश्मा बेंडकुळे, वेणू बोटे. 
फांगुळगव्हाण : आतिष पंडित, ईश्वर चव्हाण, अनिता म्हसने. 
भरविर बु : नवनाथ झनकर, खंडेराव झनकर, सावित्रीबाई झनकर, दत्तात्रय झनकर, पुंजा जुंदरे, कमलाकर सांबरे, ताराबाई सांबरे, संगीता घोरपडे सुधाकर मदगे, द्रौपदा चौरे, सारिका मदगे. 

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच

 
 

Continue Reading Gram Panchayat Results : इगतपुरीत शिवसेनेची जोरदार मुसंडी! प्रस्थापितांना धक्का

नाशिक तालुक्यात प्रस्थापिताविरोधात नवोदितांना कौल; ‘या’ गावात सत्ता परिवर्तन

नाशिक : ग्रामपंचायत निवडणुकांत सोमवारी (ता. 18) प्रस्थापितांना धोबीपछाड देत युवकांनी गावाच्या राजकारणात बाजी मारली. तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीत मतमोजणी होउन त्यात, तालुक्यातीव पूर्व पट्यातील महत्वाच्या शिंदे, पळसे, जाखोरी, पिंप्रीसैय्यद, माडसांगवी, ओढा, शिलापूरसह अनेक प्रमुख गावात प्रस्थापितांचे पॅनल पराभूत झाले. तरुण कार्यकर्त्यांना गावोगावच्या ग्रामस्थांनी संधी दिली. 

25 वर्षापासूनचे नेत्यांचे पॅनल पराभूत

नाशिक तालुक्यात आतापर्यंतच्या ग्रामीण राजकारणात शिवसेनेचा प्रभाव राहिला आहे. शिवसेनेचा उदय होत असतांना बहुतांश गावात शिवसेनेच्या पदाधिकाऱयांचा सत्ताकारणातउदय होत होता. त्यातून ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतील अनेकगटावर शिवसेनेने प्रभाव राखला होता. आजच्या निवडणूकीत शिवसेनेचे तालुक्यातून पुढे आलेले 20 ते 25 वर्षापासूनचे नेत्यांचे पॅनल पराभूत झाले आहे. 

दोन दशकानंतर परिवर्तन 

तालुक्यातील पूर्व पट्यातील पुणे महामार्गारील शिंदे, पळसे, पिंप्री सैय्यद, जाखाेरी, औरंगाबाद मार्गावरील माडसांगवी, शिलापूर, ओढा या बागायतदारांचा प्रभाव असलेल्या गावात सगळीकडेसत्ताधारी गटांना निवडणूकीत ग्रामस्थांनी हादरा दिला. 

महत्वाच्या गावाचा कौल 

पुणे मार्गावरील पळसे गावात शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख जग आगळे यांची सुमारे 25 वर्षापासूनची सत्ता संपृष्ठात आली. परपरांगत विरोधकांशी पॅनल करणे त्यांना भोवले. शिंदे गावात जि.प. माजी सदस्य संजय तुंगार व त्यांच्या भावजयी सरपंच जयश्री तुंगार यांची 25 वर्षाची सत्ता होती. आज तेथे त्यांचे पारंपारीक विरोधक व काॅग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष रतन जाधव यांच्या पॅनलच्या नव्या उमेदवारांना कौल मिळाला. जाखोरीत ग्रामस्थांनी प्रस्थापित पॅनलला सत्तेपासून दूर ठेवले. औरंगाबाद मार्गावरील शिलापूर,ओढा, माडसांगवी गावात वेगळे चित्र नव्हते.

सभापती अनिल ढिकले यांच्या बंधूच्या पॅनलचा पराभव

सत्ताधारीपॅनलचा धुव्वा उडाला नसला तरी, सत्तेपासून मात्र लोकांनी दूर ठेवले. लाखलगावला निवृत्ती कांडेकर यांच्या पॅनलला पराभव झाला. शिलापूरला मधुकर कहांडळ तर माडसांगवी येथे शिवसेनेचे तुकाराम पेखळे यांच्या पॅनलला सत्तेपासून दूर राखले. सत्ताधारी पॅनलला काहीजागा मिळाल्या पण सत्तेने मात्र पाठ फिरविली. पिंप्री सैय्यद हे माजी खासदार दिवगंत अॅड उत्तमराव ढिकले यांचे गाव तेथे सभापती अनिल ढिकले यांच्या बंधूच्या पॅनललापराभव झाला. तालुक्यातील 22 पैकी महत्वाच्या सात गावात जे चित्र होते तसेच काहीसे चित्र इतर लहान लहान गावात राहिले.  

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच

पक्षीय अस्मिता बाजूला 

गाव पातळीवर पक्षाच्या नावावर निवडणूका होत नाही. त्यात यावेळी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काॅग्रेस आणि काॅग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे सरकार असल्याने महत्वाचे नेते आमदार, खासदार ग्रामपंचायतीच्या निवडणूकांपासून दूरच राहिले. त्यांचे कार्यकर्ते मात्र सोयीनुसार सक्रिय होते. त्यात, प्रस्थापित पॅनलमध्ये संधी न मिळाल्याने अनेक तरुण कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीचा फाॅर्म्युला डोळ्यासमोर ठेउन पक्षीय नेत्याऐवजी सोयीच्या आघाडीतील विरोधकांशी जुळवून घेत, प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना आव्हान दिले. त्यात त्यांना यश आले.  

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

Continue Reading नाशिक तालुक्यात प्रस्थापिताविरोधात नवोदितांना कौल; ‘या’ गावात सत्ता परिवर्तन

पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना

दिंडोरी (नाशिक) : तालुक्यातील वलखेड ग्रामपंचायत निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागल्याने विजयी उमेदवारांच्या समर्थकाला मारहाण केल्याची घटना वलखेड फाट्यावर घडली. या घटनेत एकावर तलवारीने वार करण्यात आले आहे. 

अशी आहे घटना

वलखेड ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल सोमवारी (ता. १८) जाहीर झाला. विनायक शिंदे गटाने सर्व आठ जागांवर विजय मिळवला. त्यानंतर विजयी उमेदवार गावाकडे जात असताना वलखेड फाट्यावर पराभूत उमेदवारांच्या समर्थकांनी शिंदे गटाच्या उमेदवारांना मारहाण केल्याची तक्रारी दिंडोरी पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे. विरोधी गटातील रघुनाथ पाटील यांच्या गटातील सर्व उमेदवार पराभूत झाल्यामुळे हा वाद निर्माण झाला. त्यामुळे त्यांच्यात शिवीगाळ होऊन हाणामारी झाली. विजयी गटातील मतदार विनोद पडोळ यांच्या पायावर तलवारीने वार करण्यात आले. तसेच सचिन मेधणे यालाही मारहाण झाली. जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

दरम्यान, निवडणुकीशी कुठलाही संबंध नसतानाही पडोळ यांना मारहाण झाल्याचा आरोप शिंदे गटाने केला असून, दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तर, पाटील गटानेही शिंदे गटाविरोधात तक्रार दाखल केली आहे.  

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच

Continue Reading पराभव लागला जिव्हारी, भररस्त्यात समर्थकाने केला धक्कादायक प्रकार; दिंडोरी तालुक्यातील घटना

Gram Panchayat Results : सायगावात राष्ट्रवादीचा प्रगती पॅनल विजय; ११ पैकी ८ जागांवर वरचष्मा

सायगाव (नाशिक) : येवला तालुक्यातील सायगाव ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गणपतराव खैरनार, ॲड. सुभाष भालेराव यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनलने अकरापैकी आठ जागांवर विजय मिळवत सत्ता काबीज केली. तर, भागुनाथ उशिर, राजेंद्र खैरनार यांच्या नेतृत्वाखालील तिसऱ्या आघाडीला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. 

११ पैकी ८ जागांवर वरचष्मा 

बहुजन महासंघाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब अहिरे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत विजयश्री प्राप्त केली. विजयी उमेदवार असे वॉर्ड क्र. एकमध्ये संदीप पुंड, भाऊसाहेब अहिरे, रंजना पठारे. वॉर्ड क्र. दोनमध्ये अरविंद उशिर, रुपाली उशिर, शालन कुळधर. वॉर्ड क्र. तीनमध्ये अनिता खैरनार, गणेश माळी. तर, वॉर्ड क्र. चारमधून दिपक खैरनार, रेखा जानराव, योगिता निघुट यांनी विजय मिळवला. विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाके फोडून, गुलालाची उधळण करीत आनंद व्यक्त केला.  

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

Continue Reading Gram Panchayat Results : सायगावात राष्ट्रवादीचा प्रगती पॅनल विजय; ११ पैकी ८ जागांवर वरचष्मा

शेतकऱ्याची नजर हटताच घडला प्रकार; घटनेने परिसरात हळहळ

अंबासन (नाशिक) : शेतकरी बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत त्यांनी साधला डाव अन् झाले होत्याचे नव्हते. घडल्या प्रकाराने शेतकरी हवालदिल झाला आहे. एक घटनेनंतर दुसरी घटना समोर आल्याने एकाच समाजकंटकाचे हे षड्यंत्र असल्याचा आरोप बिजोटे येथील शेतकऱ्याने केला आहे. 

असा आहे प्रकार

बिजोटे (ता. बागलाण) येथील शेतकरी केदा भिका जाधव यांनी मगरे शिवारातील गट क्रमांक ३४८ मध्ये शेतीसाठी १०० बाय १०० ची दोन शेततळी तयार केली आहेत. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून त्यांनी शेततळ्यात मत्स्यशेती हा चांगला जोडधंदा विकसित केला आहे. शेततळ्यामध्ये एक वर्षापूर्वी प्रती एका शेततळ्यात शंभर मत्स्यबीज टाकले होते. आजमितीला विक्रीसाठी तयार झालेले मुरा, कटला, रोहू, सुपर या माशांचे संवर्धन केले आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी बाहेरगावी गेल्याने अज्ञातांनी डाव साधला आणि शेततळ्यातील काही मासे चोरीस गेले. उर्वरित माशांवर विषप्रयोग केल्यामुळे शेकडो मासे मृत झाल्याचे जाधव यांनी सांगितले. मात्र, शेजारीच असलेल्या शेततळ्यातील मासे सुरक्षित आहेत. 

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच

शेतकऱ्याचे अडीच लाखांवर नुकसान 

सकाळी नेहमीप्रमाणे माशांना खाद्य पुरविण्यासाठी शेततळ्यात गेले असता शेकडो मासे पाण्यावर तरंगताना निदर्शनास आले. त्यांनी तातडीने बळिराम जाधव, संजय जाधव, पोलिसपाटील कृष्णा जाधव, पोपट जाधव, कडू जाधव व महेंद्र जाधव यांना प्रत्यक्ष बोलवून शेततळ्यातील मृत झालेल्या माशांबाबत माहिती दिली. संबंधित व्यक्तींनी शेततळ्याची संरक्षण लोखंडी जाळी उचकटून प्रवेश केल्याचे दिसून आले आहे. यामुळे शेतकऱ्याचे साधारण अडीच लाखांवर नुकसान झाले असून, याबाबत मत्स्य विभागास माहिती कळविण्यात आली आहे.  

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

Continue Reading शेतकऱ्याची नजर हटताच घडला प्रकार; घटनेने परिसरात हळहळ

शासनाच्या कागदी घोड्यांवर नाचतोय दोनशे कोटींचा रस्ता; नागरिकांचा संताप

निफाड (नाशिक) : तीन तालुक्यांना जोडणाऱ्या हायब्रीड ॲमिनिटी मॉडेल या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने राज्यात मंजूर झालेल्या मोजक्या रस्त्यांपैकी असलेला सुरत- वघई मार्ग वन्यजीव आणि बांधकाम विभागाच्या वादात रखडला असून, हा रस्ता अर्धवट खोदल्‍यामुळे अपघातात वाढ झाली आहे. परिणामी, दोनशे कोटींचा रस्ता शासनाच्या दोन विभागांच्या वादातून थांबला आहे. तर सत्ताधारी आमदार अन्‌ हेवीवेट नेत्यांच्या मतदारसंघातील रस्त्याच्या कामाला ब्रेक कसा लागू शकतो, असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

खोदलेल्या रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले 

सुरत- वघई- वणी- पिंपळगाव बसवंत ते निफाडपर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्णत्वास येत असताना निफाड ते सिन्नर दरम्यानच्या रस्त्याचे कामदेखील प्रगतिपथावर आहेत. मात्र, वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारास सदर काम त्वरित थांबविण्याची ताकीद दिली आहे. त्यामुळे रस्ता कामाचा ठेका घेतलेल्या एबीबी कन्स्ट्रक्शनच्या सेवकांनी तातडीने मशिनरी काढून घेतली आहे. हा रस्ता अनेक ठिकाणी खोदून ठेवल्यानंतर वन्यजीव विभागाने रस्त्याचे काम बंद केल्याने रस्त्यावर पडलेली खडी, खोदलेल्या रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्ता मजबुतीकरणासाठी एका बाजूने रस्ता खोदल्याने उर्वरित निम्म्या रस्त्यावरून वाहनांची ये-जा सुरू असल्याने वाहन चालविताना वाहनधारकांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. 

वाहनचालकांचा समस्यांचा सामना करावा लागणार 

अनेकवेळा वाहनचालकांमध्ये लहान-मोठ्या चकमकी झडत आहे. तर या रस्त्यामुळे मांजरगाव येथील महिलेचा बळी गेला. खानगाव थडी येथील तरुणाचे चारचाकी वाहन नादुरुस्त झाले होते. सध्या गोदाकाठ भागात ऊस तोडणीचा हंगाम सुरू असून, थोड्याच दिवसांत द्राक्ष हंगाम सुरू होत आहे. त्यामुळे ऊस वाहतूक व शेतमाल वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांचा अनेक समस्यांचा सामना करावा लागणार आहे.

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

सुरत- वघई रस्त्याचे काम थांबविणे चुकीचे आहे. रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे. या भागातील रस्त्यांचा विकास होत असताना वन्यजीव विभागाने हा रस्ता बंद करण्यास सांगितले आहे. त्यामुळे सध्या काम बंद आहे. परंतु अशाप्रकारे काम बंद करणे चुकचे आहे. वन्यजीव विभागाने तातडीने हे काम सुरू करण्यास परवानगी द्यावी. - दिलीप बनकर, आमदार, निफाड

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच

Continue Reading शासनाच्या कागदी घोड्यांवर नाचतोय दोनशे कोटींचा रस्ता; नागरिकांचा संताप

Gram Panchayat Result : राज्यातील नागरिकांनी महाविकास आघाडी स्वीकारली – छगन भुजबळ

नाशिक : राज्यातील तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार जनतेने स्विकारले आहे. त्यामुळे नाशिकसह राज्यभर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना चांगली मत पडली त्यामुळे आता भाजपने या निकालाचे आत्मचिंतन करावे असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. ग्रामपंचाय...

Continue Reading Gram Panchayat Result : राज्यातील नागरिकांनी महाविकास आघाडी स्वीकारली – छगन भुजबळ

Gram Panchayat election results : वाहेगाव साळमध्ये नम्रता ग्रामविकास पॅनलचाच बोलबाला; ८ सभासद विजयी

वाहेगाव साळ (नाशिक) :  बहुचर्चित वाहेगाव साळ (ता. चांदवड) ग्रामपंचायतीत प्रस्थापित व माजी उपसरपंच महेश न्याहारकर यांच्या पॅनलचा धुव्वा उडवत नव्याने तयार करण्यात आलेल्या युवा पिढीच्या नम्रता ग्रामविकास पॅनलने नऊपैकी आठ जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला आहे. 

सर्वच्या सर्व ८ सभासद विजयी 

जय हनुमान ग्रामविकास पॅनल विरुद्ध नम्रता ग्रामविकास पॅनल अशी लढत झाली असून यात जय हनुमान ग्रामविकास पॅनलचा ऐतिहासिक पराभव स्वीकारावा लागला आहे. नम्रता ग्रामविकास पॅनलचे सर्वच्या सर्व ८ सभासद विजयी झाले. वार्ड क्रमांक एकमधून संदीप पवार ३०५, मेघा मंडलिक २६५, अश्विनी ललित खैरे ३१३ मतांनी तर वार्ड क्रमांक दोनमध्ये  तब्बल २० वर्षांपासून सदस्य असलेल्या देवा सोनवणे यांना मात्र संदीप खुरसने यांनी ४१४ मतांनी पराभूत केले. सीमा न्याहारकर ३५६ मतांनी विजयी. वार्ड क्रमांक तीनमध्ये रोहिदास नेटारे यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यामुळे येथील उर्वरित दोन जागांसाठी केशव खैरे ३३५ मते मिळवत तर सविता दीपक खैरे ३६० मतांनी तसेच अर्चना मंडलिक ३४० मते घेत विजयी झाल्या. 

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

सत्ता नवीन पिढीच्या हातात दिल्याने गावातील महत्वाचा पाणी प्रश्न, हागणदारी मुक्त गाव होईल कि नाही, स्ट्रीट लाईट, आर्मी, पोलीस तयारी करणाऱ्या तरुणांच्या व्यायाम शाळा व १६०० मीटर ट्रॅक, चा प्रश्न सुटेल कि नाही यावर सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच

Continue Reading Gram Panchayat election results : वाहेगाव साळमध्ये नम्रता ग्रामविकास पॅनलचाच बोलबाला; ८ सभासद विजयी

Gram Panchayat Results : माजी सरपंचांचा अवघ्या एक मताने निसटता विजय! अभोणा ग्रामपंचायतीत सत्ताकारण

अभोणा (नाशिक) : सोमवार (ता. 18) रोजी घोषित झालेल्या निकालामध्ये सत्ताकारणाचे सर्व गणित बदलले आहे. कळवण तालुक्यातील सर्वात मोठी व प्रतिष्ठेची आणि बहुचर्चित समजल्या जाणाऱ्या अभोणा ग्रामपंचायतीच्या एकूण 13 जागांसाठी सर्व समावेशक अशा निकालामुळे दुपारी 12 वाजेच्या सुमारास अभोणा चौफुली येथे गुलाल आणि फटाक्यांच्या अतिषबाजीने विजयी उमेदवारांचे स्वागत करण्यात आले. मात्र पक्षाचे राजकारण करणाऱ्या उमेदवारांचे राजकारण संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे. 

प्रभाग रचनेनुसार अनुक्रमे निवडून आलेले उमेदवार पुढीलप्रमाणे 

- प्रभाग क्र.1- नामदेव बुधा जोपळे (384), बेबीबाई कारभारी गांगुर्डे (503)
- प्रभाग क्र.2- सुनील नाना खैरनार (318), सुनिता राजेंद्र पवार (296), भाग्यश्री चेतन बिरारी (343), 
- प्रभाग क्र.3- राजेंद्र दौलतराव पवार (189), तेजस्विनी स्वप्नील मुसळे(244), विजया दिलीप जाधव (268)
- प्रभाग 4 सुबोध दीपक गांगुर्डे (293), किरण भोलेनाथ जगताप (311), मीरा पप्पू वाघ (304)
- प्रभाग क्र.5 मध्ये शंकर कडू पवार (328), मीराबाई रोहिदास पवार (170) 
हे उमेदवार विजयी झाले असून, सर्वाधिक मतदान मिळविण्याचा बहुमान बेबीबाई कारभारी गांगुर्डे यांनी मिळवला आहे. 

अवघ्या एक मताने माजी सरपंचाची सरशी...

अभोणा ग्रामपंचायतीत सलग नऊ वर्षे सरपंच म्हणून कार्यरत असणाऱ्या मीराबाई पवार यांनी एकूण तीन प्रभागात उमेदवारी केली. दोन प्रभागात पराभव तर, प्रभाग क्रमांक - 5 मधून अवघ्या एक मताने निवडून आल्यात. श्रीमती पवार यांना 170 मते मिळालीत. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी रेखा वाघ यांना 169 मते मिळाली आहेत.

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

याकडे संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष

प्रभाग क्र. 2 व 3मध्ये अतिशय चुरशीची लढत झाली. सर्व समाजाचे नेतृत्व म्हणून निवडणुकीत उतणारे युवा कार्यकर्ते नाना खैरनार यांनी विजय मिळविल्याने व माजी सरपंच राजेंद्र पाटील, भाग्यश्री बिरारी, विजया जाधव, तेजस्विनी मुसळे, शंकर पवार, सुबोध गांगुर्डे यांनी एक हाती विजय मिळविल्याने हितचिंतकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष केला. दरम्यान, सरपंच सोडतीमध्ये अभोणा ग्रामपंचायतीत कुणाची सरपंचपदी व उपसरपंचपदी वर्णी लागते, याकडे संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

Continue Reading Gram Panchayat Results : माजी सरपंचांचा अवघ्या एक मताने निसटता विजय! अभोणा ग्रामपंचायतीत सत्ताकारण