टंचाईची धग : ओझरखेड धरणातील साठा शुन्यावर

दिंडोरी (जि. नाशिक): अशोक निकम

तालुक्यात महत्वाचे धरण असलेल्या ओझरखेड मधील पाणीसाठा शुन्यावर आल्याने दिंडोरी व वणी शहराला दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. तालुक्यात प्रशासकीय पातळीवर टँकर मागणीचा अद्याप एकही प्रस्ताव आलेला नसला तरी सात गावांतील विहिरींचे अधीग्रहण करण्यात आले आहे.

  • विविध ठिकाणी सात विहरींचे अधिग्रहन
  • अद्यापही टॅंकर्सच्या मागणीचा प्रस्ताव नाहीच

तालुकक्यात तालुक्यात सुमारे ४५० च्या आसपास हातपंप असून त्यातील ५० पेक्षा अधिक हातपंप नादुरुस्त आहेत. मात्र, केंद्र व राज्य शासनाच्यावतीने गावपातळीवर राबविण्यात आलेल्या जलजीवन मिशन योजनांमुळे काही प्रमाणात पिण्याच्या पाण्यासाठी होणारी परवड थांबली आहे. ओझरखेड धरणातून एप्रिल महिन्या पिण्यासाठी (बिगर सिंचन) विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे धरणसाठ्याची पातळी कमी होऊन ती शुन्य टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे या धरणावर अवलंबून असणाऱ्या गावांच्या पाणीपुरवठा योजनांवर त्याचा परिणाम झाला आहे. तसेच पुढील काही दिवस पाऊस लांबल्यास पिण्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होऊ शकतो. ओझरखेड धरणातून दिंडोरी, वणी, चांदवड आदी शहरांना पाणीपुरवठा केला जातो. तर चांदवड तालुक्यातील ३८ गावांना महाराष्ट्र ग्रामीण पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे पुढील काही दिवसांत ओझरखेड धरणावर अवलंबुन असणाऱ्या गावांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो.

दिंडोरी शहरासाठी २००७- 200८ साली ग्रामपंचायत अस्तित्वात असतांना पाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती. माणसी सरासरी ४० लिटर पाणी तर कुटुंबाला २५० ते ३०० लिटर पाणी याप्रमाणे पाण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, आता दिंडोरी शहरात उपनगरे वाढली असून लोकसंख्येतही बरीच वाढ झाल्याने पुन्हा नव्याने सुधारीत पाणी पुरवठा योजना शासनाकडे प्रस्तावित आहे. – संदीप चौधरी, मुख्याधिकारी, नगरपंचायत, दिंडोरी.

तालुक्यात सध्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न म्हणावा तितिका गंभीर नाही. टँकर मागणीचा एकही प्रस्ताव आलेला नाही. मात्र, तालुक्यातील साद्राळे, चंडिकापूर, पांडाणे, खोरीपाड, विळवंडी, तळ्याचापाडा, फोकरपाडा आदी गावांतील खाजगी विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. पाऊस लांबल्यास पिण्याच्या पाण्यासाठी नियोजन केले जाईल. – मुकेश कांबळे, तहसिलदार, दिंडोरी.

हेही वाचा: