डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल

वाहतूक मार्गात बदल pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि. १४) शहरातील भद्रकाली, पाथर्डी फाटा व नाशिकरोड या परिसरात मिरवणुका काढणण्यात येणार आहेत. त्या निमित्त संबंधित परिसरातील वाहतूक मार्गांत बदल करण्यात आला आहे. दुपारी बारापासून मिरवणूक संपेपर्यंत हे बदल कायम राहतील, असे वाहतूक पोलिस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी सांगितले.

मुख्य मिरवणूक
भद्रकाली राजवाडा, वाकडी बारव, महात्मा फुले मार्केट-भद्रकाली मार्केट-बादशाही कॉर्नर-मेनरोड-धुमाळ पॉइंट-सांगली बँक सिग्नल-नेहरू गार्डनमार्गे शालिमार-शिवाजी रोडने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा.

पर्यायी रस्ता
– राजवाडा चौकातून सारडा सर्कल, द्वारकामार्गे इतरत्र
– दिंडोरी नाका- पेठ फाटा- रामवाडी पूल- अशोकस्तंभ- मेहेरमार्गे सीबीएस व इतरत्र

सोहळा : पाथर्डी फाटा सिग्नल येथील डॉ. आंबेडकर पुतळा

पर्यायी रस्ते
– गरवारे पॉइंटवरून उड्डाणपूलमार्गे इतरत्र
– विजय ममता सिग्नल- द्वारका उड्डाणपूलमार्गे इतरत्र
– पाथर्डी गाव ते सातपूर ही वाहतूक पांडवलेणीकडून अंबड एमआयडीसीतून मार्गस्थ
– अंबड गावाकडील वाहतूक छत्रपती संभाजी स्टेडियम- अंबड पोलिस ठाण्यामार्गे इतरत्र

नाशिकरोडची मिरवणूक
बिटको चौक- क्लालिटी स्वीट्स- मित्रमेळा कार्यालयासमोरून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा- देवी चौकमार्गे डॉ. आंबेडकर पुतळा

पर्यायी रस्ते
– सिन्नर फाटा- उड्डाणपुलावरून दत्त मंदिर चौक- सुराणा रुग्णालय- आनंदनगरी टी पॉइंटमार्गे इतरत्र
– नाशिक- पुणे वाहतूक दत्त मंदिर सिग्नलवरून उड्डाणपूलमार्गे इतरत्र
– नाशिकरोड रेल्वे स्थानकावरील बस सुभाष रोडमार्गे जातील, तर सीबीएसकडे जाणाऱ्या बस नाशिकरोड न्यायालयासमोरून मार्गस्थ होतील.

हेही वाचा:

The post डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल appeared first on पुढारी.