दिंडोरीत भास्कर भगरे यांना दिलासा, जे. पी. गावित यांची माघार

जे. पी. गावित, भास्कर भगरे

नाशिक पुढारी ऑनलाइन डेस्क – दिंडोरी लोकसभा मतदारसंघात भाजपने केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना उमेदवारी दिली आहे. तर, पवार यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार भास्कर भगरे हे निवडणूक रिंगणात आहेत. तर, महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या माकपचे जे. पी. गावित यांनी मात्र भगरे यांच्या उमेदवारी विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महाविकास आघाडीकडून माकपसाठी दिंडोरीची जागा सोडावी असा त्यांचा आग्रह होता.

गावितांच्या या निर्णयामुळे शरद पवार गटाची डोकेदुखी वाढली होती. मात्र, आज दि. 6 अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी गावित यांनी माघार घेतील असून भास्कर भगरे यांना या मतदारसंघात मोठा दिलासा मिळाला आहे.

शरद पवार यांच्या गटाकडून गावित यांना माघारीसाठी गळ घातली जात होती. अखेर शरद पवार यांच्या शिष्टाईला यश आले असून गावित यांनी माघार घेतल्याने दिंडोरीत महाविकासआघाडीचे उमेदवार असलेल्या भास्कर भगरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.