नाशिक-दिंडोरी रोडवरील अपघातातील पाचही मृतांची नावे आली समोर

दिंडोरी अपघात

जानोरी : पुढारी वृत्तसेवा नाशिक दिंडोरी रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात तीन परप्रांतीय द्राक्ष व्यापारी व दोघे मोटरसायकल स्वार जागीच ठार झाले आहेत. आज शुक्रवार( दि. 5) दुपारी हा अपघात झाला.  अपघातातील पाचही मृत व तीघा जखमींची नावे समोर आली आहेत.

नेहमीच वर्दळ असणाऱ्या दिंडोरी नाशिक रस्त्यावरील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पुढे हाकेच्या अंतरावर असलेल्या सचिन पेट्रोल पंप जवळ महिंद्रा बोलेरो जीप (क्र एम एच 15 जी आर 4105) व मोटार सायकल (क्र एम एच 15 एचएल 3156) यांच्यात समोरासमोर अपघात होऊन बोलेरो वाहनातील मुकेश कुमार यादव (25) अमन रामकिसन यादव (18) कुसुम देवी रामकिसन यादव ( 45) सर्व रा. बनारस उत्तर प्रदेश हल्ली ड्रीम कॅसल, पंचवटी नाशिक व मोटरसायकल वरील अनिल चिमाजी बोडके व राहुल अनिल बोडके रा. शिंपी टाकळी ता. निफाड हे पाच जण जागीच ठार झाले. तर अमोल रामकिसन यादव (20), विकास कपिल देव यादव (39), रामकिसन श्रीनाथ यादव (50) हे तिघे गंभीर जखमी असून त्यांच्यावर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

घटनेची माहिती मिळतात दिंडोरी पोलीस त्वरित घटनास्थळी रवाना झाले व त्यांनी जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवले. याप्रकरणी दिंडोरी पोलीस स्थानकात अपघाताचा गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास दिंडोरीचे पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक-दिंडोरी रोडवरील अपघातातील पाचही मृतांची नावे आली समोर appeared first on पुढारी.