नाशिक लोकसभा मतदासंघातून इच्छुक असलेल्या महाराजांचा अर्ज अपात्र

अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
जय बाबाजी भक्त परिवाराचे व नाशिक लोकसभा मतदारसंघातून लढण्यासाठी इच्छुक असलेले शांतीगिरी महाराज एबी फॉर्म न जोडल्यामुळे पक्षाकडून दाखल केलेले अर्ज बाद झाला आहेत.

शांतीगिरी महाराज यांनी मागील आठवड्यातच शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज भरल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. जय बाबाजी भक्त परिवाराने विडा उचलला असून या वेळेला लढायचं आणि जिंकायचं, असे महाराजांनी ठरवले  होते. मात्र अद्यापही त्यांना एबी फॉर्म देण्यात आला नसल्याने शांतीगिरी महाराजांचा अर्ज बाद झाला आहे.

नाशिकमधून यांचे अर्ज अपात्र
भक्ती अजिंक्य गोडसे, भीमराव जयराम पांडवे, जयदेव भिवसन मोरे यांची उमेदवारीच रद्द झाली. तर शांतीगिरी महाराज, अनिल जाधव, निवृत्ती अरिंगळे यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागेल.

The post नाशिक लोकसभा मतदासंघातून इच्छुक असलेल्या महाराजांचा अर्ज अपात्र appeared first on पुढारी.