नाशिक शहरातील प्रभारी पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस आयुक्तालयातील 13 पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखा, वाहतूक शाखा, विशेष शाखेसह इतर विभागांतील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. स्थानिक व तीन वर्षे पूर्ण केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असून, त्यानुसार कार्यकारी पदावरील अधिकाऱ्यांना अकार्यकारी पदावर नियुक्त केले असून, त्यांच्या जागी नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुसार शहरात 24 निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत, तर २७ सहायक निरीक्षकांच्याही बदल्या झाल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध शासकीय विभागांमधील अधिकाऱ्यांच्या बदल्या किंवा जबाबदाऱ्यांत बदल होत आहेत. त्यानुसार ग्रामीण पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्याही परिक्षेत्रात बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यानंतर पोलिस आयुक्तालयातील प्रभारी अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या बदलण्यात आल्या आहेत. त्यानुसार पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यतेखाली आयुक्तालयात झालेल्या बैठकीत पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. बदलीपूर्वी अधिकाऱ्यांनी दिलेल्या पसंतीक्रमांचा विचार करण्यात आला आहे. त्यामुळे आयुक्तालयाच्या पोलिस ठाण्यांसह विविध शाखा व पथकांचेही प्रभारी अधिकार बदलले आहेत.

पोलिस निरीक्षक सध्याचे ठिकाण बदलीचे ठिकाण
सोहन माछरे वाहतूक-२ पंचवटी प्रभारी
प्रवीण चव्हाण देवळाली कॅम्प आडगाव प्रभारी
जितेंद्र सपकाळे पंचवटी उपनगर प्रभारी
सुभाष ढवळे वाहतूक शाखा १ म्हसरूळ प्रभारी
रणजित नलवडे गुन्हे शाखा २ सातपूर प्रभारी
तृप्ती सोनवणे भद्रकाली गंगापूर प्रभारी
दिलीप ठाकूर सरकारवाडा अंबड प्रभारी
अशोक शरमाळे आर्थिक गुन्हे इंदिरानगर प्रभारी
अनिल शिंदे पंचवटी गुन्हे शाखा २
प्रमोद वाघ अंबड आर्थिक गुन्हे प्रभारी
सुरेश आव्हाड आर्थिक गुन्हे सरकारवाडा प्रभारी
विद्यासागर श्रीमनवार खंडणीविरोधी पथक देवळाली कॅम्प प्रभारी
नितीन पगार इंदिरानगर आर्थिक गुन्हे
पंकज भालेराव सातपूर आर्थिक गुन्हे
श्रीकांत निंबाळकर गंगापूर विशेष शाखा
गणेश न्हायदे आडगाव विशेष शाखा
सुरेखा पाटील विशेष शाखा सरकारवाडा दुय्यम
संजय पिसे आर्थिक गुन्हे भद्रकाली दुय्यम
ज्योती आमणे महिला सुरक्षा पंचवटी दुय्यम
राकेश हांडे वाहतूक वाहतूक शाखा युनिट १
दिवाणसिंग वसावे एनडीपीएस वाहतूक युनिट २
महेंद्र चव्हाण विशेष शाखा बीडीडीएस
प्रकाश पवार वाचक शाखा नियंत्रण कक्ष

२७ सहायक निरीक्षकांचीही बदली

शहरातील २७ सहायक पोलिस निरीक्षकांच्याही जबाबदाऱ्यांत बदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये मध्यवर्ती गुन्हे शाखेचे धर्मराज बांगर यांची वाचक शाखेत, नाशिकरोडचे हेमंत फड गुन्हे शाखेत, वाहतूकचे यतीन पाटील अंबडमध्ये, गुन्हे शाखेचे किरण रौंदळ अंबड, प्रवीण सूर्यवंशी नाशिकरोडला, तर वसंत खतेले, साजीद मन्सुरी व प्रमिला कावळे यांची गुन्हे शाखेत, भद्रकालीचे किशोर खांडवी वाहतूकमध्ये, गंगापूरचे नरेंद्र बैसाणे उपनगरला, तर मुंबई नाक्याचे सोमनाथ गेंगजे यांची गंगापूर पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post नाशिक शहरातील प्रभारी पोलिस निरीक्षकांच्या बदल्या appeared first on पुढारी.