सातपूर : पुढारी वृत्तसेवा- शिवाजीनगर परिसरातील देवराई डोंगर या ठिकाणी दोन बिबट्यांचा वावर दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
देवराई डोंगराजवळ सोमवारी (दि. 27) सकाळी फेरफटका मारण्यास गेलेल्या नागरिकांना दोन बिबटे दिसले. तसेच सातपूर मळे परिसरातही बिबट्याचा वावर आहे. हा जंगल परिसर असल्याने बिबट्यांसाठी सुरक्षित अधिवास आहे. त्यातून दोन बिबट्यांचा संचार मानवी वस्तीपर्यंत आल्याने चिंतेचे वातावरण आहे. त्याबाबत गंगापूर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे व वन अधिकारी वृषाली गाडे यांना माहिती देण्यात आली. वनकर्मचाऱ्यांनी या भागाची पाहणी केली असता, त्यांना बिबट्यांच्या पायांचे ठसे दिसून आले. या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्यांना जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांसह युवा ऊर्जा फाउंडेशनचे संस्थापक अमोल पाटील यांनी केली आहे.
हेही वाचा