नाशिक : सिडकोत अपघातात सेवा निवृत्त पोलीस कर्मचारी ठार

सिडको; पुढारी वृत्तसेवा : डिजीपीनगर परिसरात माऊली लॉन्स येथे चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार सेवा निवृत्त पोलीस कर्मचारी ठार झाले आहेत. या प्रकरणी अंबड पोलिसांनी अपघाताची नोंद झाली आहे. साहेबराव सोनू सांगळे (वय ५९ रा. डिजीपी नगर क्रमांक २) असे ठार झालेल्या सेवा निवृत्त पोलीस कर्मचारी यांचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, साहेबराव सोनू सांगळे (वय ५९) हे ॲक्टीव्हा दुचाकीवरून ( एम एच ०२ .इ .वाय ८२१९) जाधव संकुलकडून घराकडे जात असताना माऊली लॉन्स भागात चारचाकीने (एम एच १५ जे एस o९३४) दुचाकीला धडक दिली या अपघातात त्यांच्या छाती व पायाला जबर मार लागला. सांगळे यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे .

आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत सांगळे हे मुंबई येथे वाहतूक पोलीस म्हणून कार्यरत होते. गेल्या सहा महिन्यांपूर्वी सेवा निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगी व जावई परिवार आहे .

The post नाशिक : सिडकोत अपघातात सेवा निवृत्त पोलीस कर्मचारी ठार appeared first on पुढारी.