मोदींचा दौरा, गोदाघाटावर रेखाटले रामायणातील प्रसंगचित्रे

रामायणातील प्रसंग,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-श्री काळाराम मंदिर दर्शनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोदाघाटावर आरती केली जाणार आहे. त्यासाठी संपूर्ण गोदाघाट सजविण्यात येत आहे. गोदाघाटावरील मंदिरे, पूल यावर आकर्षक विद्युत रोषणाई केली जात असून, गोदाघाट परिसरातील भिंतींवर रामायणातील प्रसंगचित्रे रेखाटली आहेत. महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी बुधवारी (दि.१०) गोदाघाट परिसराची पाहणी केली.

राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी (दि.१२) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. मोदींचे नाशकात आगमन झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील हॉटेल मिरचीपासून मोदींचा रोड शो होणार आहे. यानंतर ते पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात दर्शनासाठी जाणार असून, तेथून ते गोदाघाटावर आरतीसाठी जाणार आहेत. त्यानंतर मोदींची तपोवनात जाहीर सभा होणार आहे. मोदींच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने विविध कामे हाती घेतली आहेत. आयुक्त डॉ. करंजकर यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत बुधवारी या कामांची पाहणी केली. रामकुंड, तपोवन परिसर आदी भागांची पाहणी करत विविध सूचना त्यांनी दिल्या. शहरातील चित्रकारांनी, वारली पेंटिंग, धार्मिक व रामायणातील विविध प्रसंग, शुभचिन्ह अशा विविध चित्रांनी तपोवन परिसर तसेच रामकुंड ते राममंदिर सरदार चौक मार्गे राममंदिर या भागातील विविध भिंतींवर आकर्षक चित्रे काढली आहेत. या चित्रकारांचे कौतुक आयुक्तांनी केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्यासह उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, श्रीकांत पवार, प्रशांत पाटील, शहर अभियंता शिवकुमार वंजारी, घनकचरा व्यवस्थापन संचालक डॉ. आवेश पलोड, उद्यान अधीक्षक विवेक भदाणे, शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी बी. टी. पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद सोनवणे, कार्यकारी अभियंता सचिन शिंदे आदी उपस्थित होते.

या कलाशिक्षकांनी रेखाटली भित्तिचित्रे

रामकुंड ते राममंदिर पूर्व दरवाजादरम्यान रामायणातील प्रसंग शुभचिन्हे राजेंद्र लोखंडे, सचिन पगार, विनोद सोनवणे, संतोष मासाळ, सचिन अहिरे, कृष्णा जाधव, चित्रा संधान, ज्योत्स्ना पाटील, गजानन वाल, कश्मिरा सोनवणे, विलास गायकवाड, आरती मोरे, भावना आहेर, सुनीता शेटे, एस. व्ही. काळे, अनिता गायकवाड, मालती काळे, लीना राजनोर या विद्यार्थी व शिक्षकांनी रेखाटले आहेत.

हेही वाचा :

The post मोदींचा दौरा, गोदाघाटावर रेखाटले रामायणातील प्रसंगचित्रे appeared first on पुढारी.