मोदींचा दौरा, गोदाघाटावर रेखाटले रामायणातील प्रसंगचित्रे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-श्री काळाराम मंदिर दर्शनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गोदाघाटावर आरती केली जाणार आहे. त्यासाठी संपूर्ण गोदाघाट सजविण्यात येत आहे. गोदाघाटावरील मंदिरे, पूल यावर आकर्षक विद्युत रोषणाई केली जात असून, गोदाघाट परिसरातील भिंतींवर रामायणातील प्रसंगचित्रे रेखाटली आहेत. महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी बुधवारी (दि.१०) गोदाघाट परिसराची पाहणी केली. राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या …

The post मोदींचा दौरा, गोदाघाटावर रेखाटले रामायणातील प्रसंगचित्रे appeared first on पुढारी.

Continue Reading मोदींचा दौरा, गोदाघाटावर रेखाटले रामायणातील प्रसंगचित्रे

गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी सुटले पाणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; गंगापूर धरण समूहामधून रविवारी (दि. २६) जायकवाडीसाठी पाणी साेडण्यात आले. धरणातील विसर्गामुळे गोदाघाट पाण्याखाली गेला असून, काठावरील जनजीवन विस्कळीत झाले. तसेच दारणाच्या विसर्गात ५,६९६ क्यूसेकपर्यंत वाढ करण्यात आली. त्यामुळे नांदूरमध्यमेश्वरमार्गे ३,२२८ क्यूसेक वेगाने पाणी जायकवाडीकडे झेपावत आहे. मराठवाड्याची तहान भागविण्यासाठी नाशिकच्या धरणांतून ३.१४३ टीएमसी पाणी जायकवाडीला सोडण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी …

The post गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी सुटले पाणी appeared first on पुढारी.

Continue Reading गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी सुटले पाणी

नाशिक : छटपूजेनिमित्त फुलला गोदाघाट, उत्तरभारतीयांची गर्दी

नाशिक पंचवटी : पुढारी वृत्तसेवा- दिवाळीनंतर कार्तिक चतुर्थीच्या दिवशी होणारा उत्तरभारतीय बांधवांच्या छटपूजेचा सोहळा रविवारी सायंकाळी गोदाघाटावर मावळत्या सूर्याला अर्घ्य देत मोठ्या उत्साहात झाला. यावेळी व्रतस्थ महिला व पुरुषांनी नदीपात्रात कमरेपर्यंत पाण्यात उभे राहून मनोभावे छटमातेचे पूजन केले. पूजा-अर्चा व आरती केल्यानंतर भाविक आपल्या घरी जाण्यासाठी माघारी फिरत होते. तर व्रतस्थ भाविक रात्रभर नदीपात्रात उभे …

The post नाशिक : छटपूजेनिमित्त फुलला गोदाघाट, उत्तरभारतीयांची गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : छटपूजेनिमित्त फुलला गोदाघाट, उत्तरभारतीयांची गर्दी

नाशिक : देवदर्शन अन् स्नानासाठी गोदापात्रात तुडुंब गर्दी

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा मकरसंक्रांतीचे पौराणिक आणि धार्मिक महत्त्व, त्यात रविवारची सुट्टी आणि त्र्यंबकेश्वरला निवृत्तिनाथ महाराज यात्रेसाठी ठिकठिकाणांहून दाखल झालेल्या दिंड्यांमुळे यंदा मकरसंक्रांतीला रामकुंडावरील गर्दीत प्रचंड भर पडून स्नानासाठी गोदेचे पात्र अक्षरश: तुडुंब भरले होते. पहाटेपासून झालेली ही गर्दी सायंकाळपर्यंत कायम होती. परिसरातील मंदिरात दर्शन आणि पूजेसाठी महिला भाविकांच्या रांगा लागल्याने अक्षरश: कुंभमेळ्यासारखे वातावरण …

The post नाशिक : देवदर्शन अन् स्नानासाठी गोदापात्रात तुडुंब गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवदर्शन अन् स्नानासाठी गोदापात्रात तुडुंब गर्दी

Nashik : स्मार्ट सिटी विरोधात एकवटले नाशिककर, गोदाघाटावर वारसास्थळांना वाहिली श्रद्धांजली

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा गोदाघाट येथील निलकंठेश्वर महादेव मंदिर राज्य पुरातत्व विभागाच्या अंतर्गत संरक्षित वास्तू म्हणून नोंद असून त्याच्या ३०० मीटर परिघातामध्ये राज्य पुरातत्व विभागाच्या पूर्व परवानगी शिवाय कोणतेही कामकाज होऊ शकत नाही. हा कायदा असतांना स्मार्ट सिटीने जुलै २०२० पासून श्री गोदावरी नदीपात्रात कामकाज करतांना सांडव्यावरची देवीचा सांडवा तोडला. तर सुस्थितीत असलेल्या ७५० …

The post Nashik : स्मार्ट सिटी विरोधात एकवटले नाशिककर, गोदाघाटावर वारसास्थळांना वाहिली श्रद्धांजली appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : स्मार्ट सिटी विरोधात एकवटले नाशिककर, गोदाघाटावर वारसास्थळांना वाहिली श्रद्धांजली

नाशिक : गोदाघाट परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम

 नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा गोदाघाटासह रामकुंड परिसरात मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार व स्मार्ट सिटीचे सीईओ सुमंत मोरे यांनी शुक्रवारी (दि. २५) अचानक भेट देत पाहणी केली. यानंतर मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून रामकुंड परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. यात अतिक्रमणधारकांचे साहित्य जप्त करण्यास सुरुवात केल्याने व्यावसायिकांची चांगलीच तारांबळ उडाली. चतुःसंप्रदाय आखाड्याजवळील वाहन पार्किंग …

The post नाशिक : गोदाघाट परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदाघाट परिसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम

नाशिक : गोदाघाटावर उत्तर भारतीयांची उसळली गर्दी

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा रामकुंडासह गोदाघाट परिसरात आलेल्या भाविकांकडून मावळत्या सूर्याला अर्घ्य देण्यात आले. कार्तिक शुद्ध चतुर्थीपासून सुरू झालेल्या छठ पर्वाच्या उपासनेतील षष्ठीचा महत्त्वाचा दिवस मानला जातो. सध्या नाशिकमध्ये राहात असलेले मूळचे बिहार व झारखंड येथील नागरिकांकडून ही उपासना करण्यात आली. त्यांनी सायंकाळी गोदापात्रात उभे राहून सूर्याला अर्घ्य दिले. त्यानंतर काही भाविक रात्रभर थांबून …

The post नाशिक : गोदाघाटावर उत्तर भारतीयांची उसळली गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदाघाटावर उत्तर भारतीयांची उसळली गर्दी

नाशिक : सर्वपित्री अमावास्येनिमित्त पूर्वजांचे स्मरण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पितृपक्षातील अंतिम दिवस असलेल्या सर्वपित्री अमावास्येला घरोघरी पितरांचे पूजन करून स्मरण करण्यात आले. गोदाघाटावर महालय श्राद्ध आणि पिंडदानासाठी गर्दी झाली होती. काकस्पर्शासाठी तपोवनात रांगा लागल्या होत्या. गेल्या पंधरवड्यापासून सुरू असलेल्या पितृपक्षाचा समारोप रविवारी (दि. 25) सर्वपित्री अमावास्येने झाला. आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहिती नसलेल्या नागरिकांनी या दिवशी घरोघरी पितरांचे पूजन करत …

The post नाशिक : सर्वपित्री अमावास्येनिमित्त पूर्वजांचे स्मरण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सर्वपित्री अमावास्येनिमित्त पूर्वजांचे स्मरण