मोदींच्या सभास्थळी दोन हजार अधिकारी-पोलिसांचा फौजफाटा

पोलीसांचा फौजफाटा www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तेसवा
नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदार संघातील निवडणूकीमुळे राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांच्या स्टार प्रचारकांनी प्रचारात सक्रीय सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांसह राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शरद पवार व शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांच्या बुधवारी (दि. १५) जिल्ह्यात जाहिर सभा होणार आहेत. त्यामुळे पिंपळगाव बसवंत, चांडवड आणि नाशिक शहरात सभेभोवती पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. खबरदारी म्हणून जिल्ह्यातील आंदोलकांना नजरकैदेत ठेवले जात आहे किंवा नोटीस बजावण्यात येत आहेत.

नाशिक ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत पिंपळगाव बसवंत येथे बुधवारी पंतप्रधान मोदी यांची सभा होणार आहे. तर शरद पवार यांची चांदवड आणि उद्धव ठाकरे यांची नाशिक शहरात गोल्फ क्लब मैदानात सभा होत आहे. मोदींच्या सभेसाठी ग्रामीण पोलिसांनी सुमारे दोन हजार पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला आहे. शहरातून दोनशे अंमलदार, पन्नास अधिकारी व एक उपायुक्तांची अतिरिक्त कुमकही देण्यात आली आहे. यासह राज्य राखीव पोलिस दल, केंद्रीय राखीव पोलिस दल, विशेष सुरक्षा दलाचे (एसपीजी) कमांडो यांची पथके तैनात राहणार आहेत. दरम्यान, मोदी, पवार आणि ठाकरे यांच्या सभेभोवती सशस्त्र पोलिसांचा वेढा आहे. तसेच आज बुधवारी (दि. १५) पासून मतदान प्रक्रिया सोमवारी (दि. २०) पूर्ण होईपर्यंत शहरासह ग्रामीण हद्दीत पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त नेमण्यात आला आहे. परजिल्ह्यातील सुमारे अडीच हजार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची कुमक शुक्रवारी (दि.१७) दाखल होणार आहे. त्यासाठीही शहर व ग्रामीण पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन पूर्ण केले आहे.

पिंपळगाव ते जोपुळे वाहतूकीस बंद
पिंपळगाव बसवंत येथे होणाऱ्या सभेमुळे जिल्हाभरातून नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपर जिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांनी वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून पिंपळगाव ते जोपुळे मार्गावर बुधवारी (दि.१५) सकाळी सात ते सायंकाळी पाच या वेळेपर्यंत वाहतूक बंद ठेवण्याची अधिसुचना काढली आहे.

हेही वाचा: