शॉर्टसर्किटमुळे बसला आग लागली; सुदैवाने दहा प्रवाशांचे वाचले प्राण

मोहदरी घाट बस pudhari.news
नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक पुणे महामार्गावरील मोहदरी घाटात शनिवारी (दि.23) संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास सिन्नर आगाराची बस (MH 40 N 9421) ही बस नाशिकहून सिन्नरकडे येत असताना मोहदरी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या वळणाजवळ ड्रायव्हर केबिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्यामुळे अचानक धूर निघू लागला आणि त्यानंतर बस अचानक पेटली. या बसमध्ये दहा प्रवासी प्रवास करीत होते.

चालत्या बसमधून धुर निघत असतांना ड्रायव्हरच्या ही बाब लक्षात आल्यावर त्याने तत्काळ बस थांबवून बसमधील प्रवाशांना बसमधून उतरून दिले आणि बसच्या केबिनने त्यानंतर क्षणार्धातच पेट घेतला. घटनेची माहिती माळेगाव येथील औद्योगिक वसाहतीतील अग्निशामक दल व सिन्नर नगरपालिका अग्निशामक दलाला कळवण्यात आली. अग्निशामक दलाचे वाहन तत्काळ घटनास्थळी झाल्याने आग आटोक्यात आणली. या आगीमुळे नाशिक-पुणे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
हेही वाचा:

The post शॉर्टसर्किटमुळे बसला आग लागली; सुदैवाने दहा प्रवाशांचे वाचले प्राण appeared first on पुढारी.