सकाळी 9 पर्यंत नाशिक, धुळे, दिंडोरी मतदानाची टक्केवारी अशी…

लोकसभा pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क – लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज सोमवार (दि.20) रोजी मतदान होत आहे. धुळे, दिंडोरी, नाशिक मतदारसंघात सकाळी 7 वाजेपासूनच मतदानाला सुरुवात झालेली आहे. यामध्ये धुळे लोकसभा मतदारसंघातील एकूण 6 विधानसभा मतदारसंघात सकाळी 9 वाजेपर्यंत अंदाजे सरासरी 6.92 टक्के मतदान झाले आहे. तर जिल्ह्यात दिंडोरी मतदारसंघातून 6.3 टक्के मतदान तर नाशिक मतदारसंघातून 6.38 टक्के मतदान झाले आहे. येवला लासलगाव मतदार संघात सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत 6.4 टक्के मतदान झाले आहे. चांदवड देवळा मतदार संघात सकाळी ९ वाजेपर्यंत 8 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सटाणा ता. बागलाणमध्ये सकाळी ९ वाजे पर्यंत ८.३७ टक्के मतदान झाले आहे.

बागलाण तालुक्याचे आमदार मा. दिलीप बोरसे यांनी सपत्नीक मूळगावी मतदानाचा हक्क बजावला. (छाया : सुरेश बच्छाव)
सटाणा: अंतापूर येथे आरोग्य विभागाकडून आरोग्य सेवा देण्यासाठी आशा कार्यकर्ती समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य सेवक, सुपरवायझर अपंग लाभार्थी यांना मतदान केंद्रावर नेतांना कर्मचारी. (छाया : सुरेश बच्छाव)

मोबाइलवर बंदी 
जिल्ह्यातील मतदान केंद्रांच्या आतमध्ये मोबाइल नेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस नेण्यावरही प्रतिबंध घातला आहे. त्यामुळे मतदान केंद्रामध्ये प्रवेश करताना सोबत मोबाइल व प्रतिबंधित वस्तू बाळगू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. तसेच आदेशाचा भंग करणाऱ्या मतदारांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, असा इशारादेखील देण्यात आला आहे.

दाभाडी मतदान केंद्रावर मतदानासाठी गर्दी. (छाया : निलेश शिंपी)

१०८ मॉडेल पोलिंग बूथ
जिल्ह्यात १०८ मॉडेल पोलिंग बूथची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये मतदारसंघनिहाय विशेष थीमवर दोन पोलिंग बूथ, महिला विशेष दोन, दिव्यांग विशेष एक अशा एकूण १०८ पोलिंग बूथची निर्मिती करण्यात आली आहे. तसेच मॉडेल पोलिंग बूथवर विविध थीमवर सुशोभीकरण केले जाणार आहे, सेल्फी पॉइंट, रांगोळी सजावट, मतदान जनजागृतीपर बॅनर्स असणार आहेत.

नाशिक – दिंडोरी मतदार संघातील मौजे डोंगरगाव येथे 100 वर्षावरील आजीने मतदान केंद्रावर येऊन मतदान केले. (छाया : आसिफ सय्यद)
मालेगाव कॅम्प येथे मतदान केंद्रावर झालेली गर्दी. (छाया : दिनेश कुलकर्णी)
निफाड : मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सेल्फी काढतांना मतदार. (छाया : दीपक श्रीवास्तव)