अनैतिक प्रेम संबंधातून भाच्यानेच काढला मामीचा काटा

Murder

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा- येथील एकलहरे रोड, सामनगाव परिसरात राहणाऱ्या एका 27 वर्षीय महिलेची निर्घुण हत्या झाल्याची घटना (दि. 6 मार्च) रोजी घडली. सुरुवातीला अज्ञात व्यक्तीकडून ही हत्या झाल्याचे बोलले जात होते. मात्र पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत तपास पूर्ण केल्यावर वेगळच सत्य समोर आलं आहे.

तपासात भाच्यानेच मामीचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अनैतिक संबंधातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. संशयित आरोपीने आपल्यावर संशय येऊ नये, यासाठी चाकूने स्वतःच्या गळ्यावर वार करून घेतला. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत. उपचारानंतर संशयितास अटक केली जाणार असून त्याच्यावर नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्रांती सुदाम बनोरिया ( वय 27 ) राहणार जगताप मळा, एकलहरे रोड असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. महिलेचा भाचा अभिषेक राजेंद्र बनोरीया याने एकतर्फी प्रेमातून हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.

खून झालेल्या महिलेचा पती सुदाम बनोरिया याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गुन्हेगाराचा शोध घेतला. बनोरिया कुटुंबाचा पाणीपुरीचा व्यवसाय होता.

हेही वाचा :

The post अनैतिक प्रेम संबंधातून भाच्यानेच काढला मामीचा काटा appeared first on पुढारी.