‘एमबीबीएस’ला अॅडमिशन घेऊन देतो सांगून 34 लाखांचा गंडा

MBBS

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- कोल्हापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस करीता प्रवेश देण्याचे आमिष दाखवून संशयितांनी एका महिलेस ३४ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. संशयितांनी २५ सप्टेंबर २०२२ रोजी नाशिक पुणे रोडवरील एका हॉटेलमध्ये गंडा घातल्याचे महिलेसे सांगितले.

विशाखा वानखेडे (रा. कॉलेज रोड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित सचीन म्हात्रे (रा. डोंबिवली, जि. ठाणे) कल्पना पाटील (रा. नाशिकरोड) यांनी ३४ लाख ६१ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. विशाखा यांच्या मुलास कोल्हापूर येथील डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज येथे एमबीबीएस साठी मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळवून देतो असे संशयितांनी विशाखा यांना सांगितले. खोटे आश्वासन देत प्रवेशासाठी विशाखा यांच्याकडून पैसे घेतले. मात्र संशयितांनी महाविद्यालयात प्रवेश करून न देता विशाखा यांची फसवणूक केली. याबाबत विशाखा यांनी विचारणा केल्यावर संशयितांनी शिवीगाळ व दमदाटी केली. त्यामुळे त्यांनी मुंबई नाका पोलिसांत तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक निसार शेख तपास करीत आहेत. पोलिस दोघा संशयितांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा :

The post 'एमबीबीएस'ला अॅडमिशन घेऊन देतो सांगून 34 लाखांचा गंडा appeared first on पुढारी.