भुजबळ फार्मची ड्रोनद्वारे रेकी केल्याचा संशय, पोलिस बंदोबस्त वाढवला

छगन भुजबळ, भुजबळ फार्म नाशिक

सिडको : पुढारी वृत्तसेवा- नाशिकमधील भुजबळ फॉर्मवर शुक्रवारी दि.6 एप्रिल रात्री सात ते सव्वा तास वाजेच्या सुमारास ड्रोन कॅमेरा फिरल्याने खळबळ उडाली आहे. रेकीच्या संशयावरून भुजबळ फॉर्मवर बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. यासंदर्भात अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकुर यांनी माहिती दिली आहे.

याबाबत भुजबळ फॉर्म येथील सुरक्षा अधिकारी दिपक म्हस्के यांनी अंबड पोलिस ठाणे येथे तक्रार अर्ज दाखल केला आहे. यात ना. छगन भुजबळ यांचे निवासस्थान असलेले ‘भुजबळ फॉर्म’ वर शुक्रवारी रात्री सात ते सव्वा तास वाजेच्या दरम्यान कॅमेरा ड्रोन फिरताना दिसला.  कॅमेरा ड्रोन च्या सहाय्याने भुजबळ फार्मची रेकी केल्याचा संशय व्यक्त होत आहे. या प्रकरणी पोलिस उपायुक्त मोनिका राऊत व
सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख व अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकुर यांनी भुजबळ फॉर्म येथे भेट दिली व माहिती घेतली. त्यानंतर तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु केला आहे. तक्रार अर्जानंतर भुजबळ फॉर्मवर बंदोबस्तात वाढ करण्यात आली असल्याची माहिती अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकुर यांनी दिली.

हेही वाचा –

The post भुजबळ फार्मची ड्रोनद्वारे रेकी केल्याचा संशय, पोलिस बंदोबस्त वाढवला appeared first on पुढारी.