कटारिया, पारख यांच्या घरातून कागदपत्रे जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-बांधकाम व्यावसायिक नरेश कारडा यांच्यासह अशोक कटारिया आणि सतीष पारख यांच्याविरुद्ध एमपीआयडी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी कटारिया व पारख यांच्या घराची आणि कार्यालयाची झडती घेतली. त्यात महत्वाची कागदपत्रे जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

शनिवारी (दि. २०) सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत व रविवारी (दि. २१) सकाळी पुन्हा झडती घेण्यात आली. तर कटारिया यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. बांधकाम व्यावसायिक कारडा यांच्यासह इतर संशयितांविरोधात आठ गुन्हे दाखल आहेत. त्यात उपनगर पोलिस ठाण्यात चार, मुंबई नाका, व देवळाली कॅम्प पोलिसांत प्रत्येकी एक, व नाशिकरोड पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहे. दोन गुन्ह्यात कटारिया यांचाही सहभाग आहे. उपनगर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करीत शनिवारी सायंकाळी सातपासून रात्री उशिरापर्यंत कटारिया व पारख यांच्या घरासह कार्यालयात झडती घेतली. यात संबंधित बांधकाम प्रकल्पाच्या व्यवहारांची कागदपत्रे व इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. रविवारी (दि. २०) सकाळी पुन्हा हे सत्र राबविण्यात आले. याप्रकरणात पोलिसांनी सर्व कागदपत्रांची पडताळणी सुरु केली आहे. दरम्यान, कारडा यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली आहे.