गोमांस विक्री करणारे 10 गुन्हेगार दीड वर्षांसाठी तडीपार

तडीपार www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गोवंशीय जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांसह गोमांस विक्री करणाऱ्या 10 गुन्हेगारांना पोलिस आयुक्तालयाने दीड वर्षासाठी शहर व जिल्ह्यातून तडीपार केले. या स्वरूपाच्या गुन्ह्यात पोलिसांनी पहिल्यांदाच कारवाई केली आहे.

पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सराईत गुन्हेगारांवर मोक्का, स्थानबद्ध व तडीपारी अशा प्रतिबंधात्मक कारवाया करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार भद्रकाली पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील संशयितांविरुद्ध सहायक आयुक्त डॉ. सिद्धेश्वर धुमाळ व वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी तडीपारी प्रस्तावित केली. त्यानुसार, उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी 10 संशयितांना तडीपार केले आहे.

यांना केले तडीपार 

सदाम कय्युम उर्फ बबलू कुरेशी, शोएब समद कुरेशी, इम्रान रमजान खान, इरफान नूर कुरेशी, सादीक मुश्ताक कुरेशी, मोहम्मद जोहेब अस्लम कुरेशी, जावेद रहीम कुरेशी, दानिक रफिक शेख, जोहेब उर्फ सोनू समद कुरेशी आणि अंजुम बिस्मील्ला कुरेशी अशी तडीपार केलेल्या संशयितांची नावे आहेत.

हेही वाचा :

The post गोमांस विक्री करणारे 10 गुन्हेगार दीड वर्षांसाठी तडीपार appeared first on पुढारी.