जळगाव जिल्हा उन्हाने तापला, सरासरी 44 अंश सेल्सिअस तापमान

उन्हाचे चटके,www.pudhari.news

जळगाव- जिल्हा हा ज्याप्रमाणे केळी व कापूस या पिकांसाठी ओळखला जातो. त्याचप्रमाणे तो तापमानासाठी ही संपूर्ण देशात ओळखला जातो. आज (दि. 28) रोजी जिल्ह्याचे सरासरी तापमान 44 अंश सेल्सिअस होते तर जळगाव शहराचे 42.8 तर भुसावळचे 43.8 अंश सेल्सिअस तापमानाची वेलनेस वेदर याच्या कडून मिळालेल्या माहितनुसार नोंद झालेली आहे.  तर शासकीय ममुराबाद येथील हवामान शाळेने दिलेल्या तापमानानुसार 41.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

जळगाव जिल्हा हा ज्याप्रमाणे कापूस व केळीसाठी प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे तो सर्वाधिक उच्चांक तापमानासाठी सुद्धा ओळखला जातो. आज मुंब्राबाद येथील शासकीय तापमान केंद्रामध्ये किमान 41.8 कमाल 23.6 आद्रता 51 टक्के अशी नोंद करण्यात आलेली आहे. तर वेलनेस वेदर च्या नुसार जिल्ह्यात उच्च तापमानाची हॅट्रिक. कमाल तापमान आज पुन्हा त्याच स्तरावर नोंद झाली आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील 42 अंशाच्या वर सहा शहरे असून 43 अंशाच्या वर 11 शहरे आहेत.

सर्वाधिक तापमान हे भुसावळ वरणगाव या ठिकाणी 43.8 नोंद करण्यात आलेली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ परिसरात तापमान वाढण्याचे मुख्य कारण दिपनगर येथील औष्णिक विद्युत केंद्र त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जाळण्यात येणारा कोळसा चिमणीतून बाहेर पडणारे कार्बन्स तसेच मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड आजही भुसावळ शहर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात विनापरवाना वृक्षतोड होत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 निर्मितीच्या कामापूर्वी मोठमोठे वृक्ष तोडण्यात आली होती मात्र अजून पर्यंत रस्ता बनवून पूर्ण झालेला असतानाही रस्त्याच्या दोन्ही कडेला वृक्ष लागवड झालेली कुठेच दिसून येत नाही. जी वृक्ष लागवड करण्यात आलेली आहे ती अशी थातूर मात्र फुलांची दिसून येते त्यामुळे जळगाव भुसावळ प्रवास करताना उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात जाणवते.

जिल्ह्यातील तापमान

जळगाव 42.8°C
बोदवड 42°C
चोपडा 42°C
चाळीसगाव 42°C
पाचोरा 42.5°C
फैजपूर 42.8°C

भुसावळ 43.8°C
अमळनेर 43°C
धरणगाव 43°C
भडगाव 43°C
एरंडोल 43°C
जामनेर 43.5°C
मुक्ताईनगर 43°C
पारोळा 43°C
रावेर 43°C
वरणगाव 43.8°C
यावल 43°C

हेही वाचा :

The post जळगाव जिल्हा उन्हाने तापला, सरासरी 44 अंश सेल्सिअस तापमान appeared first on पुढारी.