धक्कादायक ! ठार मारलेल्या बिबट्याचे संशयिताच्या घरात सापडले अवशेष

मृत बिबट्याचे अवशेष www.pudhari.news

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा- इगतपुरी तालुक्यातील बिबट्याच्या शिकारी प्रकरणात इगतपुरी वन विभागाच्या पथकाकडून तपास सुरू होता. पिंपळगाव मोर येथील मोराचा डोंगर येथे शिकार झालेल्या जंगल परिसरात सकाळी ९ पासून दुपारी २ वाजेपर्यंत बिबट्या आणि अन्य वन्यप्राण्याच्या इतर अवयवांचा शोध मोहीम सुरु असतांना ह्या शोधमोहीमेत वन विभागाचा कडक खाक्या दाखवल्यानंतर संशयित आरोपींच्या घरातून प्राण्याच्या हाडांचे अवशेष मिळाले आहेत. मिळालेले अवशेष हे प्रथमदर्शी बिबट्याचे असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. Nashik Leopard Hunting

पुढील तपासणीसाठी हे सर्व अवशेष प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. वन अधिकाऱ्यांनी मृत बिबट्याचे ४ सुळे व १ नख देखील हस्तगत केले असून ही महत्वपूर्ण शोधमोहीम नाशिक पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग, पश्चिम भाग नाशिक, सहा. वनसंरक्षक ( रोहयो व वन्यजीव ) अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरीचे प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी केतन बिरारीस यांच्यासह पेठ व ननाशी येथील वनक्षेत्र कर्मचाऱ्यांच्या पथकाने ही जबाबदारीने पार पाडली. Nashik Leopard Hunting

नेमकं प्रकरण काय? Nashik Leopard Hunting

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांना पिंपळगाव मोर शिवारातील मोराच्या डोंगराच्या पायथ्याशी काही संशयित बिबट्याची कातडी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बुधवारी (दि.१३) सकाळी सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले. भोंदूबाबाला बसण्यासाठी बिबट्याच्या कातडीची गादी विकणारी ही टोळी इगतपुरी तालुक्यात जेरबंद करण्यात आली होती.

संशयित आरोपी संतोष जाखेरे याचा साथीदार संन्यासी दिलीपबावा यास बावागिरी करण्यासाठी वाघाचे कातडे असलेली गादी पाहिजे होती. त्यासाठी संशयित नामदेव पिंगळे हा गुरे चारण्यासाठी मोराचे डोंगरावर जात असे. या ठिकाणी वन्यप्राण्यांचे पाणी पिण्याचे डोहाजवळ त्याने रात्रीच्या वेळी मोटरसायकलच्या क्लजवायरचा गळफास लावला. पाणी पिण्यासाठी आलेल्या बिबट्याला पकडून त्याने ठार मारले. यानंतर संशयितांनी बिबट्याची कातडी काढून निर्जन ठिकाणी सुकवली. कातडी ही संन्यासी दिलीप बाबा यास विक्री करण्यासाठी जात होती, असे पोलिस तपासात समोर आले.

 

हेही वाचा –

The post धक्कादायक ! ठार मारलेल्या बिबट्याचे संशयिताच्या घरात सापडले अवशेष appeared first on पुढारी.