नाशिक: लासलगाव बाजार समितीतून छगन भुजबळांचा फोटो हटवला

राकेश बोरा

लासलगाव: राज्यामध्ये मराठा आरक्षणाचे वातावरण तापलेले असताना आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्याचे पडसाद उमटले. येथेही मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष पाहायला मिळत आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक ओबीसींचे मातब्बर नेते व मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली लढवली. परंतु, सभापतींच्या मुख्य दालनातील त्यांचा फोटो हटविण्यात आला आहे. आता तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावण्यात आला आहे. Chhagan Bhujbal

बाजार समितीच्या गेल्या तीन पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या शब्दाला मान राखला गेला. सभापती-उपसभापती निवडीत त्यांचा शब्द अंतिम असे. मात्र, रविवारी सायंकाळी सभापतींच्या मुख्य दालनातील मंत्री भुजबळ यांचा फोटो काढून त्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे.
यावेळी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रवीण कदम, शिवसेना शहर अध्यक्ष प्रमोद पाटील, ज्ञानेश्वर इंगळे, सोनू केदारे आदीसह मराठा समाजातील तरुण वर्ग उपस्थित होते.

हेही वाचा 

The post नाशिक: लासलगाव बाजार समितीतून छगन भुजबळांचा फोटो हटवला appeared first on पुढारी.