नाशिक: ललित पाटील याची मुंबई पोलिसांकडून शिंदे गावात चौकशी

नाशिक रोड, पुढारी वृत्तसेवा :  एमडी ड्रग्स अड्ड्याची माहिती घेण्यासाठी मुंबई पोलिसांचे पथक संशयित आरोपी ललित पाटील याच्यासह रविवारी (दि. २२) सकाळी साडेआठच्या दरम्यान शिंदे गावात दाखल झाले. त्यांनी गावातील ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण पाटील चालवत असलेल्या एमडी ड्रग्स अड्ड्याची तपासणी केली. यामुळे गावात खळबळ उडाली. मागील रविवारी ( दि.१५ ) पुणे पोलिसांचे पथक शिंदे गावात ललित पाटील याचा भाऊ भूषण पाटील याला घेऊन दाखल झाले होते. त्यांनी देखील एमडी ड्रग्स अड्ड्याची पाहणी करत काही कामगारांची चौकशी केली होती. Lalit Patil

संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेले एमडी ड्रग्स प्रकरणाचा छडा लावण्यासाठी अतिशय गुप्त पद्धतीने पोलिसांचे पथक शिंदे गावात दाखल झाले. अन तितक्याच गुप्त पद्धतीने निघून गेले. दोन वाहनांसह पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश पोलीस पथकात होता. दरम्यान डोंगरावर निर्जन ठिकाणी असलेला हा अड्डा साकीनाका पोलिसांनी अगोदर शोधून काढला होता. त्यानंतर तपासाची चक्र वेगाने फिरत पोलिसांनी अगोदर भूषण पाटील आणि त्याचा भाऊ ललित पाटील या दोघांनाही अटक केली आहे. Lalit Patil

Lalit Patil : कंपनीची माहिती पालकावर नाही :

शिंदे गावात बहुतांश छोट्या कंपन्या आहेत, काही मोठ्या देखील कंपन्या आहेत. प्रत्येक कंपनीच्या बाहेर कंपनीचे नाव उत्पादनाचा फलक लावलेला असतो. कर्मचाऱ्यांची माहिती देखील संबंधित विभागाला देणे आवश्यक असते. पण शिंदे औद्योगिक वसाहतीतील बहुतेक कंपन्यांच्या बाहेर फलकच दिसत नाही.

शिंदे गावात रविवारी ड्रग्स अड्ड्याच्या तपासणीसाठी मुंबई पोलिसांचे पथक आले होते. याविषयी कल्पना होती. या प्रकणातील चौधरी नावाच्या संशयित आरोपीला घेऊन पोलीस घेऊन येणार असल्याची नोंद आमच्याकडे आहे. सोबत ललीत पाटील देखील होता. पोलिसांच्या तीन टीम असल्याची माहिती आहे.

रामदास शेळके , वरिष्ठ पोलीस निरीक्षक

हेही वाचा 

The post नाशिक: ललित पाटील याची मुंबई पोलिसांकडून शिंदे गावात चौकशी appeared first on पुढारी.